अमळनेर : सुरुवातीला ज्वारी खरेदीचे आदेशच नव्हते. उशिराने नोंदणीचे आदेश आल्यानंतर आता गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीला विलंब आणि ज्वारी खरेदीचे उद्दिष्टही कमी केले. लोकसभा निवडणूक संपताच वेगळे नियम लागू केल्याने शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचा आरोप होत आहे. (Jalgaon jowar Amalner taluka only 2622 quintals purchased)
अमळनेर तालुक्यात ज्वारीच्या शासकीय खरेदी साठी सुमारे ४३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण ८०० हेक्टर क्षेत्रातील ज्वारी खरेदीसाठी तयार आहे. शासनाच्याच धोरणानुसार प्रति हेक्टर २०.५० क्विंटल ज्वारी म्हणजे ८०० हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १६ हजार क्विंटल ज्वारी खरेदी अपेक्षित आहे. ज्वारी खरेदीसाठी ३० जुन अंतिम मुदत आहे.
मात्र नुकतेच शासनाने जळगाव जिल्ह्याला २९ हजार ८९८ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ने शेतकरी नोंदणीप्रमाणे उद्दिष्ट विभागून दिले आहे. अमळनेर तालुका शेतकरी संघाला पत्र पाठवून तालुक्यासाठी फक्त २ हजार ६२२ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे पहिल्या १०० शेतकर्यांचीच ज्वारी खरेदी होऊ शकते. (latest marathi news)
त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून इतरत्र ज्वारी खरेदीला सुरुवात झाली असून अमळनेर तालुक्याला गोदाम उपलब्ध नसल्याने सुरुवात नाही. शासनाकडे गोदाम उपलब्ध नाही आणि बाजार समितीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम उपलब्ध आहेत. शासनाकडे त्यांचे लाखों रुपये भाडे थकबाकी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा चालवली आहे.
"मार्केटिंग फेडरेशनचे बाजार समितीत गोदाम रिकामे असून दरवर्षी शासकीय खरेदीसाठी ते वापरले जातात. पुरवठा विभागाकडे सुमारे १५ लाख रुपये भाडे थकबाकी आहे. तरीही तहसीलदारांचे पत्र प्राप्त होताच शेतकऱ्यांसाठी तात्काळ गोदाम उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल."-जी एन मगरे ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी , जळगाव
"जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ला भाडे तत्वावर बाजार समितीतील गोदाम उपलब्ध करण्यासाठी पत्र दिले आहे."- रुपेशकुमार सुराणा , तहसीलदार ,अमळनेर
"शेतकऱ्यांना कमी भावात ज्वारी विकावी लागली. मतदानापूर्वी खरेदीचे आदेश दिले आणि मतदान संपताच उद्दिष्ट कमी केले. गोदाम ही उपलब्ध करून देत नाहीत. पावसाळा सुरू झाला की आर्द्रता वाढली म्हणून शेतकऱ्यांचा माल फेटाळला जाईल अशी थट्टा शासन करीत आहे. शासनाने किमान उद्दिष्ट तरी वाढवून द्यावे."- प्रा सुभाष पाटील ,शेतकरी नेते,अमळनेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.