जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधी व्यस्त आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तालुकास्तरावर निवडणूक कामांच्या नियोजनाचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात ‘ऑक्टोबर हिट’सोबतच विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांची होरपळ होत आहे. असे असतानाच पीकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून क्षेत्र पाहून पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून तीनशे ते पाचशे रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. (farmers crop insurance problem)