Jalgaon News : शेतकऱ्यांना प्रतीक्षा पीककर्जाची! बँका, विकास संस्थांमध्ये कर्ज वितरणाची तयारी सुरू

Jalgaon News : एप्रिल महिना सुरू झाल्याने पीक कर्जफेड केलेल्या सभासदांना नवीन पीक कर्जाची प्रतीक्षा लागली असून बँका व विकास संस्थांमध्ये सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.
Crop Loan
Crop Loanesakal
Updated on

गणपूर : एप्रिल महिना सुरू झाल्याने पीक कर्जफेड केलेल्या सभासदांना नवीन पीक कर्जाची प्रतीक्षा लागली असून बँका व विकास संस्थांमध्ये सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. दरवर्षी बँका व विकास संस्था कर्जदार धोरण व तांत्रिक समितीच्या मंजुरीनुसार नवीन वर्षासाठी एप्रिल पासून पीक कर्ज वाटप करत असतात. या वर्षी जिल्हा बँकेने मंजूर केलेले पीक कर्जाची मर्यादा खालील प्रमाणे ठरविण्यात आली आहे. (Jalgaon Crop Insurance)

जिरायत कापूस हेक्टरी ४४ हजार तर बागायत कापूस ५० हजार ६०० रुपये, ऊस (आडसाली,पूर्व हंगामी,सुरू व खोडवा) ८८ हजार रुपये प्रति हेक्टरी,केळी-एक लाख चार हजार पाचशे, टिश्यू कल्चर केळी- १ लाख ५४ हजार या प्रमाणे कर्ज वाटप होणार आहे.तर मका ३२ हजार ७५०, बाजरी २५ हजार, ज्वारी ३० हजार रुपये प्रति हेक्टर.

याशिवाय तीळ २७ हजार ५०० रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेमार्फत खरीप हंगामातील जिरायत, बागायत व रब्बी हंगामातील एकूण ७६ पिकांसाठी अल्प मुदत पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.तर हळद,बटाटा ,आर्वी या पिकांसाठी २ हेक्टरपर्यंत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. (latest marathi news)

Crop Loan
Jalgaon Lok Sabha Election : अमळनेरला युती, आघाडीत राजकीय शांतता! मतदार संघात युती, आघाडीचा अजून एकही मेळावा नाही

परवानगीची अट

बऱ्याच ठिकाणी नदीच्या पलीकडे जिल्हा बदलतो.त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या जमिनी नदी पलीकडे असल्यामुळे त्यांना त्या तालुक्याचे असिस्टंट रजिस्ट्रार व जिल्हा रजिस्ट्रार (डी डी आर) यांच्या परवानगीची अट घालण्यात आल्याने पीक कर्ज वाटपास विलंब होऊ शकतो. येथील विकास संस्थेत असे ४१ कर्ज घेणारे सभासद आहेत.

गावनिहाय कर्ज वाटप कोटीच्या घरात

एका गावात सुमारे पाच कोटी रुपये कर्ज वाटप होते.त्यात काही बँका कर्ज देतात तर काही सभासद विकास संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून कर्ज घेतात.येथील विकास संस्थेत ४२४ कर्जदार सभासद असून गतवर्षी फक्त संस्थेमार्फत एक कोटी ९० लाख रुपये कर्जवाटप झाले होते. संस्थेचे एक कोटी ७० लाख बँक कर्ज असून दोन कोटी २३ लाख मेंबर कर्ज असल्याचे सचिव प्रकाश राणे यांनी सांगितले.

Crop Loan
Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसे कधी करणार भाजपमध्ये ‘एन्ट्री’?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.