जळगाव : जिल्हा परिषदेतील महिला बालकल्याण अधिकारी मयूरी करपे- राऊत यांचा हृदयविकाराने झालेल्या मृत्युप्रकरणी त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. मयूरी यांचे पती देवेंद्र राऊत हेदेखील त्याच विभागात कार्यरत असून त्यांच्यावर सीईओंनी कामाचा व अन्य बाबींचा अतिरिक्त ताण टाकल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्या तणावातून मुलीस हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप मृत मयूरी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. (Father allegations of daughter death due to zp CEO interrogation )