Jalgaon News : तिसऱ्या मजल्यावरून कोसळून महिला मजूर गंभीर; कामगार कार्यालयासह प्रशासन अनभिज्ञ

Jalgaon : औद्योगिक वसाहत परिसरात सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ५५ वर्षीय महिला मजुजूर खाली कोसळल्याची घटना बुधवारी घडली.
crime
crimeakal
Updated on

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ५५ वर्षीय महिला मजुजूर खाली कोसळल्याची घटना बुधवारी घडली. गेल्या चार दिवसांपासून ही महिला मजूर मृत्यूशी झुंज देत असून, सुरक्षित उपाययोजना न करता कामे करवून घेणारा कंत्राटदार आणि इमारतीचा मालक अशा दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Female labourer falls from third floor and administration unaware with serious labor office )

सुप्रीम कॉलनी परिसरात प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५, रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) ही ज्येष्ठ महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीत-ई सेक्टरमध्ये धीरज युवराज महाजन यांच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे प्रमिलाबाई गांधी जयंतीच्या दिवशी बुधवारी (ता. २) कामावर आल्या होत्या. ठेकेदाराने दिलेल्या कामाप्रमाणे त्या तिसऱ्या मजल्यावरून बांधकामावरील वेस्‍टेज मटेरियल खाली फेकत होत्या. अशातच त्यांचा तोल जाऊन त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाल्या. (latest marathi news)

crime
Jalgaon News : शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनासाठी 11 कोटी 88 लाख 64 हजार मंजूर

घटना घडताच त्यांच्यासेाबत कार्यरत इतर मजुरांनी मदतीला धाव घेत त्यांना उचलून जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सलग चार दिवसांपासून प्रमिलाबाई यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत. प्रमिलाबाई यांचे पती शंकर चव्हाण यांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेत या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांत इमारत मालक धीरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान (दोघे रा.जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत.

सुरक्षा उपाय योजनांची वानवा

औद्योगिक वसाहत परिसरात धीरज महाजन यांच्या बहुमजली इमारतीचे काम सुरू असून, कामगार कायद्यानुसार आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता बांधकामावर काम करणाऱ्या प्रत्येक मजुराला सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपकरणे देणे बंधनकारक आहेत. कंत्राटदार, अभियंता आणि मालकाची जबाबदारी असताना तिघांनीही मजुरांना सुरक्षेचे उपकरणे पुरविलेले नाही. याबाबत जिल्‍हा प्रशासनाचा प्रतिनीधी, कामगार आयुक्त यांनी अशा बांधकामांच्या नोंदी आणि निरीक्षण करणे अपेक्षित आहे. सुरक्षा उपाययोजनांच्या पाहणीसह संबंधित साइटवर प्रथमोपचाराच्या काय उपाययोजना आहे, याची खात्री करावी, असे होताना दिसून येत नाही.

crime
Jalgaon News : लग्नाचे आमिष दाखवून जळगावात महिलेवर अत्याचार; पीडित गर्भवती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.