Jalgaon News : अमळनेर बायपासवर अखेर पथदीप सुरू; सकाळच्या पाठपुराव्याला यश

Jalgaon : सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाढते अपघात तसेच वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी महामार्गावर म्हसवे फाटा ते सत्यनारायण मंदिरापुढे शहराचा बायपास काढण्यात आला.
Street lights started on Amalner Bypass.
Street lights started on Amalner Bypass. esakal
Updated on

Jalgaon News : सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाढते अपघात तसेच वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी महामार्गावर म्हसवे फाटा ते सत्यनारायण मंदिरापुढे शहराचा बायपास काढण्यात आला. या बायपासवर पथदीप बसविण्यात आले खरे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे पथदीप निव्वळ शोपीस ठरू पाहत होते. ‘सकाळ’ने याबाबत सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून हे पथदीप सुरू झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. 9Jalgaon Finally street lights are on at Amalner Bypass)

‘सकाळ’ ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने अमळनेर बायपासवरील पथदीप नुकतेच सुरू केले आहेत. महामार्गावरील बायपासचे बरेचसे पथदीप अद्याप देखील सुरू न झाल्यामुळे तत्काळ संबंधित विभागाने अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.

बायपासवरील पथदीपाबाबत ‘सकाळ’ने नेहमी लक्षवेधी वृत्त प्रसिद्ध केले. पथदीपाबाबत उशिरा का होईना सुरवात झाल्याने वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बायपासवर अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव या बायपास मार्गातून गमवावा लागला आहे. (latest marathi news)

Street lights started on Amalner Bypass.
Jalgaon News : कुत्रा निर्बिजीकरण कामाचा मक्ता बंद; गैरव्यवहारप्रकरणी गुन्ह्यानंतर कारवाई

धरणगाव चौफुली, वंजारी रस्त्यालगत असलेला बायपास या ठिकाणी पथदीप नसल्यामुळे अनेकदा या भागात अपघात झाले आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून अति महत्त्वाच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

धरणगाव चौफुलीसह वंजारी बायपासवर पथदीप बसवावेत. धरणगाव, पारोळा व जळगाव धुळे यांना जोडणाऱ्या बायपास लगत पथदीप बसविण्याची गरज आहे. वंजारी लगत असलेल्या अंडरपास मध्ये मोठ्या वसाहती शैक्षणिक संकुल आहे. त्यामुळे तेथे पथदीप बसवावेत अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

Street lights started on Amalner Bypass.
CM Shinde Jalgaon Daura : पुलाच्या कामासाठी ‘नाबार्ड’मधून निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.