Shravan Somvar 2024 : यंदा पाच श्रावणी सोमवार; सुरवात अन्‌ शेवट सोमवारीच! आजपासून शिवमंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम

Shravan Somvar 2024 : श्रावण महिन्यात देवाधिदेव महादेवाची उपासना केली जाते. पूजा, अभिषेक करण्यास पसंती असते. सोमवारी (ता. ५) श्रावण महिना सुरू होत आहे, तर २ सप्टेंबरला सोमवारीच श्रावण महिन्याचा शेवट होणार आहे.
mahadev
mahadevesakal
Updated on

जळगाव : भगवान महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात. मात्र, श्रावण महिन्यात त्याला विशेष महत्त्व असते. दर सोमवारी अभिषेक, उपवास, पूजा केली जाते. यंदा सुमारे ७१ वर्षांनंतर श्रावण महिन्याची सुरवात आणि शेवट सोमवारने होणार आहे. १८ वर्षांनंतर यंदा ५ श्रावण सोमवार आले आहेत. मागील वर्षी अधिक मासामुळे दोन श्रावण महिने होते.

या काळात आठ श्रावण सोमवार आले होते. श्रावण महिन्यात देवाधिदेव महादेवाची उपासना केली जाते. पूजा, अभिषेक करण्यास पसंती असते. सोमवारी (ता. ५) श्रावण महिना सुरू होत आहे, तर २ सप्टेंबरला सोमवारीच श्रावण महिन्याचा शेवट होणार आहे. (Five Shravan somvar this year)

दुर्मिळ योग

३ सप्टेंबरला श्रावण अमावास्या आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा ७१ वर्षांनंतरचा दुर्मिळ योग आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९५३ ला श्रावणाला सोमवारी सुरवात झाली होती, तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा श्रावणी सोमवार आला होता.

श्रावणात यंदा पाच सोमवार

५ ऑगस्ट, १२, १९, २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर, असे पाच सोमवार यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये आले आहेत.

(latest marathi news)

mahadev
Shravan 2024 : भारताबाहेर असलेल्या भगवान शंकरांच्या या मंदिरात एका शापामुळे राजकन्या बनली देवी

श्रावण महिन्यात पूजा, अभिषेक

महादेवाच्या आराधनेला श्रावण महिन्यात अधिक महत्त्व असते. यंदा श्रावण महिना सोमवारपासून सुरू आणि समाप्तीही सोमवारीच होणार आहे. ५ श्रावण सोमवार असून, या कालावधीत पूजा, अभिषेक करण्यास भाविकांची पसंती असते, असे पंचांगकर्त्यांनी सांगितले.

शहरातील विविध शिवमंदिरात सोमवारपासून महापूजा, अभिषेक, रुद्र हवन, रुद्राभिषेक, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रात श्रावण मासानिमित्त रुद्र हवन करण्यात येणार आहे. सकाळी सहाला ही सेवा सुरू होईल. त्यासोबतच रोजची गायत्री सहस्त्रनामाची सेवाही होणार आहे.

mahadev
Shravan 2024 : भाविक प्रवाशांसाठी जादा बस उपलब्‍ध; त्र्यंबकेश्‍वरसाठी नवीन सीबीएसवरून 25 अतिरिक्‍त बसगाड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.