Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्ताने हेलिकॉप्टरने पृष्पवृष्टी

Maha Shivratri 2024 : ॲड रोहिणी खडसे यांच्या तर्फे सिध्देश्वर चांगदेव मंदिर व श्रीक्षेत्र मेहूण मुक्ताई मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
Siddheshwar Changdev Temple and Sri Kshetra Mehun Muktabai Temple were showered with flowers by helicopter.
Siddheshwar Changdev Temple and Sri Kshetra Mehun Muktabai Temple were showered with flowers by helicopter.esakal
Updated on

Maha Shivratri 2024 : "मनी दर्शनाची तळमळ, मुखी नामाची चळवळ अंतरी भूतदया कळकळ, भजुया सिध्देश्वर चांगदेव सर्वकाळी"

अशा भावनेतून चांगदेव महाराज आणि मुक्ताईच्या दर्शनाची मनात आस असलेल्या हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत येथील सिध्देश्वर चांगदेव महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवार (ता.८) पासून उत्साहात सुरुवात झाली. (Jalgaon Flower shower by helicopter on occasion of Mahashivratri)

तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात आदिशक्ति मुक्ताईच्या यात्रोत्सवास आलेल्या वारकरी दिंड्यांसह असंख्य भाविक या यात्रेस आलेले आहेत. तसेच आज मंदीरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. सिध्देश्वर चांगदेव महाराजांनी चौदाशे वर्षे तपश्चर्या केल्याने तपोभूमी अशी ओळख असलेल्या या भागात महाशिवरात्रीला यात्रोत्सव सुरु होतो.

त्यानुसार आज पहाटे पाच पासून सिध्देश्वर चांगदेव महाराज मुर्तीला स्नान, रुद्राभिषेक व महापूजा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, ॲड. रविंद्रभैया पाटील, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंकुश राजेंद्र चौधरी, डॉ. केतकी व डॉ. वैभव पाटील, चांगदेवचे सरपंच निखिल बोदडे.

माजी सरपंच पंकज कोळी, सपत्निक, फोफनारचे सौरभ महाजन यांच्या हस्ते सपत्निक महापूजा व रुद्राभिषेक झाला. दिपक जाधव, जिवराम महाजन, अक्षय चौधरी उदय शेजोळे, मिथुन महाजन आदी उपस्थित होते. यात्रोत्सवासाठी विदर्भ, खान्देश, मराठवाडासह विविध भागातून आलेल्या दिंड्यातील भाविकांसाठी पुजेनंतर मंदीर खुले करण्यात आले.

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

महाशिवरात्री निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार महिला गटाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड रोहिणी खडसे यांच्या तर्फे सिध्देश्वर चांगदेव मंदिर व श्रीक्षेत्र मेहूण मुक्ताई मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. ॲड रोहिणी खडसे यांनी दर्शन घेतले. (latest marathi news)

Siddheshwar Changdev Temple and Sri Kshetra Mehun Muktabai Temple were showered with flowers by helicopter.
Jalgaon News : जिल्ह्यात उद्योगासाठी 1200 कोटीची गुंतवणूक : खासदार उन्मेश पाटील

गुरु-शिष्य भेट

आदिशक्ति मुक्ताईची दिंडी शिष्य चांगदेव महाराजांच्या भेटीला येऊन गुरु शिष्याची परंपरा आहे. यावर्षीही गुरुवर्य मुक्ताई व शिष्य चांगदेवांची भेटीचा सोहळ्या निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि टाळ-मृदंगाच्या गजरात अवघे श्रीक्षेत्र चांगदेव दुमदुमले.

संगम दर्शनावर गर्दी

यात्रेला येणाऱ्या भाविकांनी तापी-पूर्णा संगमावर स्नानाला गर्दी केली. तापी-पूर्णा नद्यांचा संगमावर अथांग जलाशय आणि निसर्ग सौंदर्यामुळे यात्रेकरूनी नौकाविहाराचा आनंद लुटला. जवळपास पंचवीस ते तीस नौका याठिकाणी नौकाविहारानी भाविकांना सेवा दिली.

येथील विविध मंदीरात दानशुर व धार्मिक सामाजिक मंडळातर्फे चहा, दुध व फराळाचे वाटप झाले. रात्री मुक्कामी राहून उद्या (ता. ९) संगमावर स्नान करुन सिध्देश्वर चांगदेवांचे दर्शन घेऊन महाशिवरात्रीचा उपवास सोडतील.

Siddheshwar Changdev Temple and Sri Kshetra Mehun Muktabai Temple were showered with flowers by helicopter.
Jalgaon News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आज ठरणार; जळगाव लोकसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.