Jalgaon News : विभागीय आयुक्तांनी घेतला जंगल सफारीचा अनुभव; पर्यटन वाढीसाठी वन आणि महसूल यंत्रणा एकत्र येणार

Jalgaon : विभागीय महसूल विभागातील सातपुड्याच्या पट्ट्यातील पहिल्या जंगल सफारीचा आनंद विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी आज ( ता २३ ) पहाटे घेतला.
Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game, Assistant Commissioner Vitthal Sonawane during the Satpura Jungle Safari.
Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game, Assistant Commissioner Vitthal Sonawane during the Satpura Jungle Safari.esakal
Updated on

Jalgaon News : विभागीय महसूल विभागातील सातपुड्याच्या पट्ट्यातील पहिल्या जंगल सफारीचा आनंद विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी आज ( ता २३ ) पहाटे घेतला. या सफारीत त्यांना अस्वल, नीलगाय, मोर, रान डुकरे आणि बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले.

एप्रिल महिन्यापासून ही जंगल सफारी रसिकांना खुली करण्यात येणार आहे. (Jalgaon Forest and revenue systems will come together to boost tourism)

पहाटे सहाला जळगाव येथे मुक्कामी असलेले श्री गमे आणि श्री सोनवणे यांनी पाल गाठले, आणि सातपुड्याच्या पट्ट्यातील जंगल सफारीला सुरवात झाली. सुमारे २७ किलोमीटर अंतराच्या ट्रॅकवर आणि ३ हजार ३०० हेक्टरवर पसरलेल्या या जंगलात पहाटे भ्रमंतीचा आनंद श्री गमे यांनी घेतला.

सातपुड्याच्या अंतर्गत भागात असलेल्या सुकी डॅम, माकडदरी धबधबा, या भागातील जंगलातील मचाण, संरक्षक कुटी ( झोपडी ), ठिकठिकाणी प्राण्यांसाठी उभारलेले पाणवठे आणि परिसरातील विविध पक्षी यांचे श्री गमे यांनी निरीक्षण केले.

त्यांनी नंतर पाल येथे विश्रामगृहाला भेट देऊन पाहणीही केली.जंगल सफरीत वन क्षेत्रपाल अजय बावणे, छायाचित्रकार प्रवीण दौंड, वन विभागाचे कर्मचारी सुपडू सपकाळे, अरुणा ढेपले, राजू बोंडल, युवराज मराठे आणि रवी सोनवणे सोबत होते.

एप्रिल पासून जंगल सफारी

वनविभागाने जंगलात भटकंती वाढविण्यासाठी नागरिकांसाठी एप्रिल महिन्यापासून जंगल सफारीचे प्रयत्न सुरु आहे. जंगल सफारी होणार असलेल्या भागातून रस्ते तयार करणे आदी कामे सुरू आहेत. ती मार्च अखेर पूर्ण होतील असे वनविभागाच्या सूत्रांची अपेक्षा आहे. याबाबत गारबर्डी गावातील २० तरुणांना गाइड म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. (latest marathi news)

गारबर्डीच्या संयुक्त वन हक्क समितीला या जंगल सफारीचे शुल्क निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला असून एका गाडीत ४-५ निसर्गप्रेमी ही भटकंती करू शकतील. येथे येणाऱ्या पर्यटकांना चहा, नाश्तापाणी, जेवण आदि सुविधा उपलब्ध होतील. यातून ४० ते ५० युवकांना रोजगार मिळू शकेल अशी वनविभागाची अपेक्षा आहे. असल्याचे वन क्षेत्रपाल अजय बावणे यांनी सांगितले.

...तर उत्तर महाराष्ट्राची पहिली सफारी

वनविभागाची ही सफारी सुरु झाल्यास, नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्राची ही पहिलीच जंगल सफारी ठरणार आहे. असंख्य निसर्गप्रेमींसाठी ही जंगल सफारी पर्वणीच ठरणार आहे. अस्वल, बिबट्या, नीलगाय, मोर, रानडुकरे, काळ्या ठिपक्यांची हरणे आणि असंख्य प्रकारचे पक्षी या जंगलात असून निसर्गप्रेमी ही भटकंती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

"वनविभागाने एप्रिलपासून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या संकल्पनांच्या अनुषंगाने ही भेट होती. वन विभागाकडून तसा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. महसूल विभागातर्फे काय काय मदत करता येईल. त्याचा विचार केला जाईल." - राधाकृष्ण गमे (विभागीय आयुक्त नाशिक महसूल विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.