Jalgaon Crime News : भुसावळला गोळीबार! 2 ठार; घटनेचे कारण अस्पष्ट

Jalgaon Crime : स्वीफ्ट डिझायर कारमध्ये बसलेल्या माजी नगरसेवकासह व्यावसायिकावर अज्ञातांनी बुधवारी (ता. २९) रात्री पावणेदहा ते दहाच्या दरम्यान बेधुंद गोळीबार केला.
The car shot by the killers.
The car shot by the killers.esakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील न्यू सातारा रोडवरील मरिमाता मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावर असलेल्या स्वीफ्ट डिझायर कारमध्ये बसलेल्या माजी नगरसेवकासह व्यावसायिकावर अज्ञातांनी बुधवारी (ता. २९) रात्री पावणेदहा ते दहाच्या दरम्यान बेधुंद गोळीबार केला. यात दोघेही जण जागीच ठार झाले. यामुळे घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहर हादरले असून, पोलिस अधीक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. (Former councillor and businessmen were shot indiscriminately by unknown assailants )

भुसावळ शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. शहरात काही वर्षांपूर्वी मोहन बारसे यांचा भरदिवसा खून झाला होता. त्यानंतर खूनाचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २९) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचे व्यवसायिक मित्र सुनील राखुंडे जळगावकडून सातारा भागातील मरिमाता मंदिराजवळ स्वीफ्ट डिझायर कार (एमएच १९, ईजी ०१८७)मधून जात होते.

The car shot by the killers.
Jalgaon Crime: जुन्नी टोळीच्या मदतीने सराफा पेढ्या फोडण्याचा धडाका! एक लाखांची चांदी जप्त; रितेशने आखली गुन्ह्यांची ब्लुप्रिंट

सुनील राखुंडे वाहन चालवीत होते. त्यावेळेस अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मात्र, मारेकरी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळतात पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला आहे. वाल्मीकनगर परिसरात काही अप्रिय घटना घडू नये, म्हणून त्या ठिकाणीही पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

The car shot by the killers.
Jalgaon Crime News : चोपड्यातील श्रीकृष्ण कॉलनीत धाडसी चोरी; दोघांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.