Jalgaon Political News : प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव डी. जी. पाटील ‘भाजप’त; भाजपची ताकद वाढणार

Jalgaon Political : काँग्रेसचे माजी सचिव डी. जी. पाटील यांनी अखेर शनिवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Rural Development Minister Girish Mahajan While welcoming Former Congress Secretary D. G. Patil
Rural Development Minister Girish Mahajan While welcoming Former Congress Secretary D. G. Patil esakal
Updated on

Jalgaon Political News : जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव डी. जी. पाटील यांनी अखेर शनिवारी (ता. २) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. श्री. पाटील यांच्यासोबत धरणगाव काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र न्हायदे ,माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष गोपाल बाविस्कर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. (Jalgaon Former Secretary of Pradesh Congress D G Patil in BJP party)

या वेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, हेडगेवार नगरचे उपसरपंच चंदन पाटील हे उपस्थित होते. श्री. पाटील हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावान सैनिक म्हणून काम करीत होते. मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी असलेली जवळीक आणि श्री. चव्हाण यांच्यावरील निष्ठा यामुळे अशोक चव्हाण जिथे असतील तिथेच आम्ही राहू, असे यापूर्वीच श्री. पाटील यांनी जाहीर केले होते.

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशापाठोपाठ जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांचे कार्यकर्ते श्री. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपत जात आहेत. श्री. पाटील, डॉ. उल्हास पाटील अशा मोठ्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यातील काँग्रेसची निश्चितच हानी होणार आहे. (latest marathi news)

Rural Development Minister Girish Mahajan While welcoming Former Congress Secretary D. G. Patil
Jalgaon News : शहरातील रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी; रस्त्यांच्या गुणवत्तेचे यांत्रिक परीक्षण

श्री. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे. मात्र धरणगाव तालुका तसेच जळगाव ग्रामीणच्या राजकारणात देखील नव्याने काही उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये श्री. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने ‘काही खुशी कही गम’ अशी अवस्था निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र, शहरासह तालुक्यातील श्री. पाटील यांच्या निकटवर्तीय काँग्रेसचे काही निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसमध्येच आहेत.

ते काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे सांगतात. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारीबाबत चाचपणी पाहता भाजपच्या तिकिटासाठी डी. जी. पाटील स्पर्धेत राहू शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Rural Development Minister Girish Mahajan While welcoming Former Congress Secretary D. G. Patil
Jalgaon Water Scarcity : पाणी टंचाईच्या झळा सुरू; 22 गांवाना 26 टँकरने पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()