Jalgaon Girna Dam : गिरणा धरणाची नव्वदी पार; चौदाव्यांदा धरण शंभरी गाठणार

Girna Dam : गिरणा धरणाने आज सकाळी नव्वदी पार करत सायंकाळी सहापर्यंत ९१.६७ टक्के पाणीसाठा झाला.
Water storage in Girna Dam on Tuesday.
Water storage in Girna Dam on Tuesday.esakal
Updated on

Jalgaon Girna Dam : गिरणा धरणाने आज सकाळी नव्वदी पार करत सायंकाळी सहापर्यंत ९१.६७ टक्के पाणीसाठा झाला. धरण चौदाव्यांदा शंभरी गाठणार आहे. त्यामुळे गिरणा परिसरात शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. गिरणा धरण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून भरायला सुरुवात झाली. त्यानंतर शेवटच्या आठवड्यातच शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. काल (ता. २६) रात्री धरणात ७३.७६ टक्के एवढा पाणीसाठा होता. (fourth time Girna Dam will reach hundred percent full )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.