Jalgaon Fraud Crime : शेअर बाजारात गुंतवणूकच्या नावे 6 लाखांना गंडा!

Jalgaon Fraud Crime : अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे पाच लाख ९५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
Fraud Crime
Fraud Crime esakal
Updated on

Jalgaon Fraud Crime : शहरातील जयनगरातील ५६ वर्षीय ज्येष्ठ व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे पाच लाख ९५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Fraud Crime 6 lakhs stolen in name of investment in stock market)

जळगाव शहरातील जयनगरातील ओंकारेश्वर मंदिराजवळ हेमेंद्र राजेंद्र शर्मा (वय ५६) कुटुंबासह वास्तव्याला आहे. अनेक वर्षांपासून ते व्यापारात असून, त्यांची बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे. राम इनव्हेस्टमेंट नावाच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप ॲडमीन गुरूराम या नावाच्या व्यक्तीने हेमेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क साधला.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शर्मा यांचा विश्वास संपादन करून त्यांनी टेकस्टार कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगितले. (Latest Marathi News)

Fraud Crime
Crime News: ब्रेकअपचा बदला, प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल; गुन्हा दाखल!

त्यासाठी गुरूराम नामक व्यक्तीने त्यांनी टेकस्टार या नावाचे ॲड्राईड ॲल्पिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२४ ते ४ एप्रिल २०२४ दरम्यान त्यांच्या खात्यातून एकूण ५ लाख ९५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर त्यांना मुद्दल आणि नफा परत मिळाला नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्री. शर्मा यांनी शनिवारी (ता. २७) दुपारी दीडला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुरूराम नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

Fraud Crime
Nashik Crime News : अवैध धंद्यांवर कारवाई; पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.