Jalgaon Fraud Crime : शेतजमीनच्या व्यवहारापोटी रक्कम घेऊनही खरेदी करून न देता बांधकाम व्यावसायिक पीयूष कमलकिशोर मणियार (वय २६, रा. गणेशवाडी) यांची ७० लाख ४८ हजार रुपयांमध्ये फसवणूक झाली. पीयूष मणियार यांना रियल इस्टेट एजंट धीरज विजय पाटील (रा. रिंग रोड, जळगाव) याने शेतकरी रवींद्र शांताराम पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) यांची शिरसोली प्र.बो. येथील गट क्रमांक २२३/३मधील शेतजमीन विक्री असल्याचे सांगितले. (Fraud of businessman in purchase of agricultural land )
श्री. मणियार व शेतकरी पाटील यांच्यात जमिनीचा व्यवहार ९० लाख रुपयांमध्ये ठरला. त्यानुसार मणियार यांनी आरटीजीएस व रोखीने एकूण ७० लाख ४८ हजार रुपये दिले. व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी धीरज पाटील याची असताना, त्याने रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्याला आणले नाही, तसेच रक्कमही परत दिली नाही. व्यवहार पूर्ण होत नसल्याने मणियार यांनी शेतकरी शांताराम पाटील यास बोलवले असता, एजंट पाटील याने पैसे न दिल्याने खरेदीखत करून देता येणार नाही, असे शेतकऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.