Jalgaon News : तंत्रनिकेतनातील तीनशेवर विद्यार्थिनींना दररोज मोफत नाश्‍ता! मुलींच्या सुदृढतेसाठी प्रयत्न

Latest Jalgaon News : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावर्षी या वसतिगृहाला भेट दिल्यानंतर मुलींच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करताना या उपक्रमाची सुरवात केली. त्यांच्या पुढाकाराने व स्थानिक दात्यांच्या मदतीतून हा उपक्रम तेव्हापासून अविरतपणे सुरू आहे.
A female student having breakfast in the hostel canteen of Government Tannariketan.
A female student having breakfast in the hostel canteen of Government Tannariketan.esakal
Updated on

Jalgaon News : शासकीय तंत्रनिकेतनातील मुलींच्या वसतिगृहात सकाळी बहुतांश मुली आपापल्या डीश घेऊन नाश्‍ता करताना दिसतात. कधी पोहे, कधी उपमा, तर कधी कडधान्याची उसळ.. सोबत केळी, दूधही कधी कधी असते.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावर्षी या वसतिगृहाला भेट दिल्यानंतर मुलींच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करताना या उपक्रमाची सुरवात केली. त्यांच्या पुढाकाराने व स्थानिक दात्यांच्या मदतीतून हा उपक्रम तेव्हापासून अविरतपणे सुरू आहे. (Free breakfast for 300 female students of engineering college)

या वर्षाच्या सुरवातीला फेब्रुवारी महिन्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील हे जळगाव येथे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनातील जिमखान्याचे उद्‌घाटन नियोजित होते. ठरल्याप्रमाणे हा दौरा व उद्‌घाटन सोहळा पार पडला.

त्यावेळी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधताना मंत्री पाटील यांना त्यातील बहुतांश विद्यार्थिनी प्रकृतीने सडपातळ आढळून आल्या. त्यांनी याबाबत विचारले असता, आर्थिक अडचणींमुळे मुलींना सकाळचा नाश्ता घेता येत नसल्याची बाब समोर आली.

संवेदनशील दादांचा पुढाकार

यासाठी शासनातर्फे कुठलीही तरतूद नसल्याने संवेदनशील मनाच्या चंद्रकांत पाटील यांनी येथील भरत अमळकर, सुनील बढे, दीपक परदेशी यांच्यासह अभाविपच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या विद्यार्थिनींसाठी उत्कृष्ट दर्जाचा नाश्‍ता पुरवठा करण्यासाठी आवाहन केले. त्यानुसार याठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून नाश्‍ता पुरविण्याची जबाबदारी या सेवाव्रतींसह अन्य दानशूर व्यक्तींनी स्वीकारली. (latest marathi news)

A female student having breakfast in the hostel canteen of Government Tannariketan.
HC on False Promise of Marriage: लग्नाचे वचन देऊन बलात्कार, विवाहित महिला नाही करू शकत असा दावा; हायकोर्टाचे महत्वाचे निरीक्षण

सकस आहार, नाश्‍ता

फेब्रुवारी महिन्यापासूनच दररोज सकाळी विद्यार्थिनींना सकस, पौष्टिक नाश्‍ता पुरविला जातो. त्यात दूध,केळी, उपमा, पोहे, पराठा असा आहार देण्यात येत आहे, असे या ठिकाणच्या विद्यार्थिनींनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व शहरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच संघटनांनी विद्यार्थिनींच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी दाखवलेल्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या ऑगस्टमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील दौऱ्यावर असताना त्यांनी वसतिगृहातील या विद्यार्थिनींशी संवाद साधला. राखीपौर्णिमेचे दिवस असल्याने मुलींनी मंत्री पाटील यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

"शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना सकाळचा सकस आहार म्हणून नाश्‍ता पुरविण्याची जबाबदारी माझ्यासह काही कार्यकर्त्यांवर टाकली. आम्ही ती दात्यांच्या मदतीने पार पाडत आहोत. मुलींना पौष्टिक आहार मिळाल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहतेय, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आमचे समाधान आहे."- दीपक परदेशी

A female student having breakfast in the hostel canteen of Government Tannariketan.
'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची ऑस्करसाठीच्या शेवटच्या यादीमध्ये निवड; कलाकारांना आनंद अनावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.