Jalgaon News : जिल्हा नियोजन विभागाचा अवघा 4 हजारांचा निधी परत

Jalgaon News : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना वार्षिक अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या ५१० कोटींपैकी मार्चअखेर सर्व ५१० कोटींचा निधी वितरित झाला.
Fund
Fund esakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना वार्षिक अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या ५१० कोटींपैकी मार्चअखेर सर्व ५१० कोटींचा निधी वितरित झाला. विशेष म्हणजे यंदा संपूर्ण वितरित निधी खर्च झाला आहे. अवघ्या चार हजाराचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर तांत्रिक कारणास्तव पुनर्विनियोजन करता येत नसल्याने शासनाला परत गेला. जिल्हा प्रशासनाने आक्टोबरपासून जिल्हा नियोजनाचा निधी खर्चावर फोकस केला होता. (Jalgaon Fund of District Planning Department only 4 thousand returned)

कामांची मंजुरी, निधीची मंजुरी व कामे पूर्ण करण्यावर भर दिला होता. याचे फलित म्हणून यंदा जिल्हा नियोजनाचा अपेक्षीत आराखड्यानुसार खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ९२ कोटी मंजूर होता ३१ मार्च अखेर तो निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित झाला.

आदिवासी घटक कार्यक्रम

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेसाठी २४ कोटींचा निधी मंजूर होता. तो निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून संपूर्ण वितरित निधी खर्च झालेला आहे. जिल्हा आदिवासी उपयोजना क्षेत्र वार्षिक योजना अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ३१ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर आहे. तो निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करून खर्च झाला आहे. (latest marathi news)

Fund
Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे पक्ष भाजपसमोर उभे करणार कडवे आव्हान

डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ४ कोटी तरतूर आहे. पैकी १ कोटी ६४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. १ कोटी ५४ लाखांचा निधी वितरित झाला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत २२२ कोटी निधी मान्यता आहे. या कामांवर रुपये ५० कोटी ५३ लाख प्राप्त झाले आहेत.

तसेच यापूर्वी मंजूर कामांकरिता स्पिल ओवरने रुपये ५३ कोटी ९८ लाख असे एकूण अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ११३ कोटी ५० लाख प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८१ कोटी २२ लाखांचा निधी वितरित झाला आहे.

Fund
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘जळगाव’साठी भाजपत इच्छुकांच्या पुन्हा हालचाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.