Jalgaon News : वाडे येथील जवानावर अंत्यसंस्कार; रेल्वे अपघातात 3 दिवसांपूर्वी झाला होता मृत्यू

Jalgaon : सुटी संपल्यानंतर पुन्हा देशसेवेत रुजू होण्यासाठी जात असताना वाडे (ता. भडगाव) येथील जवान समाधान सखाराम महाजन यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
MLA Kishore Patil offering garland on the dead body of a jawan. Crowd attends funeral of jawan.
MLA Kishore Patil offering garland on the dead body of a jawan. Crowd attends funeral of jawan.esakal
Updated on

Jalgaon News : सुटी संपल्यानंतर पुन्हा देशसेवेत रुजू होण्यासाठी जात असताना वाडे (ता. भडगाव) येथील जवान समाधान सखाराम महाजन यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मृत जवानावर शुक्रवारी (ता. २६) वाडे गावात दुपारी अडीचच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाडे येथील जवान समाधान महाजन (वय २३) पूँछ येथे सैन्यदलात कार्यरत होते. (funeral of soldiers in War had taken place 3 days ago in train accident )

घरी एका महिन्याच्या सुटीवर ते आले होते. सुटी संपल्यानंतर कर्तव्यावर हजर होण्यासाठी ते निघाले. प्रवासादरम्यान, मालपूर आग्राजवळ रेल्वे अपघातात मंगळवारी (ता. २३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव गुरुवारी (ता. २५) दिल्लीहून संभाजीनगरला विमानाने आणण्यात आले. शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराला वाडे येथे पार्थिव आणण्यात आले. या वेळी महाजन यांचे आई-वडील, पत्नी, काका, काकू यांच्यासह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

घरीही पोलिस व नाशिक आर्मी गार्ड यांनी सलामी दिली. तेथून सजविलेल्या वाहनावरून पार्थिवाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावात शहीद जवानाच्या श्रद्धांजलीचे डिजिटल बॅनर्स झळकत होते. गावात तसेच बस स्थानक परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत तीनशे मीटरचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. देशभक्तिपर गीते वाजविण्यात आली. गावालगतच्या प्लॉट परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाजन यांच्या पार्थिवाला त्यांचा पुतण्या प्रसाद रामकृष्ण माळी याने अग्निडाग दिला. (latest marathi news)

MLA Kishore Patil offering garland on the dead body of a jawan. Crowd attends funeral of jawan.
Jalgaon News: पाचोऱ्यात मोकाट जनावरे जप्तीची मोहीम! नागरिकांमधून समाधान; गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई

आमदार किशोर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भय्यासाहेब पाटील, शिवसेनेचे भडगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक राजेंद्र परदेशी, जालिंदर चित्ते (वाडे), शिवसेना- भीमसेना तालुकाप्रमुख शैलेश मोरे, समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, मच्छिंद्र शार्दूल, समाधान पाटील (कोठली), भाजपचे पाचोरा अध्यक्ष अमोल पाटील, भडगाव भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, उपाध्यक्ष रतिलाल पाटील.

विकास पाटील (बांबरूड), शिवसेनेच्या (उबाठा) नेत्या वैशाली सूर्यवंशी, माजी नगरसेविका योजना पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे. के. पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, तालुका उपाध्यक्ष रतन परदेशी, गोंडगावचे दत्तू मांडोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, परदेशी-राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, ‘पीटीसी’चे अध्यक्ष संजय वाघ, विकी पाटील, शरद पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ. निळकंठ पाटील, सरपंच राहुल पाटील (गोंडगाव), प्रा. गुणवंतराव अहिरराव, सरपंच रघुनाथ महाजन (कजगाव)

माजी सरपंच ललित धाडिवाल, वाडे वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, लिपिक एम. एम. कोळी, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर, उपनिरीक्षक शेखर डोमाळे, उपनिरीक्षक किशोर पाटील, गटविकास अधिकारी अन्सार शेख, दिलीप चिंचोरे, जळगाव सैनिक बोर्डाचे सुभेदार नितीन पाटील, देविदास पाटील, प्रमोद पाटील, चाळीसगाव जयहिंद सैनिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. ए. पाटील, सचिव आबासाहेब पाटील, उपाध्यक्ष संभाजी पाटील, आबासाहेब गरुड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

MLA Kishore Patil offering garland on the dead body of a jawan. Crowd attends funeral of jawan.
Jalgaon News : सफाई कामगारांच्या 8 वारसांना अमळनेर पालिकेत नेमणुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.