Jalgaon Ganesh Visarjan 2024: जळगावात तब्बल 16 तास चालली मिरवणूक! अखेरच्या मंडळाच्या बाप्पाचे सकाळी साडेसहाला विसर्जन

Latest Ganeshotsav 2024 News : गणरायाची सलग दहा दिवस मनोभावे भक्ती केल्यानंतर मंगळवारी (ता.१७) अकराव्या दिवशी मोठ्या जल्लोषात विदाई करण्यात आली.
Ganpati visarjan
Ganpati visarjanesakal
Updated on

Jalgaon Ganesh Visarjan 2024 : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’चा जयघोष करीत अत्याधुनिक लाइट-साऊंड सिस्टिमसह पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात अन्‌ लेझीमच्या तालावर भक्तांनी लाडक्या बाप्पाला जल्लोषात व भक्तिमय वातावरणात निरोप दिला. डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी जळगावची विसर्जन मिरवणूक ठरली.

तब्बल पंधरा- सोळा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर बुधवारी (ता. १९) सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी शेवटच्या खडके चाळ मित्रमंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (Ganesh Visarjan 2024 procession lasted for 16 hours in city)

गणरायाची सलग दहा दिवस मनोभावे भक्ती केल्यानंतर मंगळवारी (ता.१७) अकराव्या दिवशी मोठ्या जल्लोषात विदाई करण्यात आली. राज्यात जळगावच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. शिस्तबद्धता, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि आरास मिरवणुकीतील कलावंतांचे सादरीकरण बघण्यासाठी जिल्हाभरातून भाविक दाखल होतात.

यंदाच्या मिरवणुकीत मंडळांनी साकरलेल्या देशभक्तीपर, सामाजिक व ज्वलंत विषयांवरील सजीव आराससह मंडळातील लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले होते. पोलिस दलाने केलेल्या आवाहनास गणेश महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत यंदा निर्विघ्नपणे मिरवणूक पार पाडली.

ढोल-पथकांनी दणाणले

जळगाव शहरातील विसर्जन मिरवणुकीत ६५ पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी झाले होते. मिरवणुकीत सहभागी मंडळांनी यंदा जिल्ह्यासह राज्यभरातून ढोल-ताशांच्या पथकांना पाचारण केले हेाते. तर, महिलांचे ढेालपथकही यावेळी लक्षवेधी ठरले. पारंपरिक वाद्यांनी यंदा जळगावची मिरवणुकीची वेगळी ओळख तर कायम ठेवली.

मंत्री महाजनांनी धरला ठेका

मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी विविध पक्ष, संस्था, संघटनांनी स्टॉल लावले होते. भाजप महानगरतर्फे मंडळांचे स्वागत करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर उपस्थित मंत्री गिरीश महाजन यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नाचण्यासाठी खाली बोलावले. महाजनही उत्साहाने त्यात सहभागी झाले. लेझीमच्या नृत्यावर त्यांनी ठेका धरला. आमदार सुरेश भोळेही यात सहभागी झाले.

शहरात गर्दी मावेनाशी

मुख्य रस्त्यावरून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचे दर्शन हे एक अलौकिक सुखाची अनुभूती असून, अगदी कडेवरील बाळांसह दाम्पत्य, लहान मुले, वयोवृद्ध आजी-आजोबा मिरवणुका बघण्यासाठी आले होते. सकाळी दहाला मिरवणुकीसाठी मंडळांनी आपापली वाहने शिस्तीत रांगेत उभी करीत ठेका धरायला सुरवात केली होती. मिरवणूक बघण्यासाठी सकाळपासूनच शहरासह गाव-तालुक्यातून भाविक दाखल झाले होते. शहरातील रस्ते सायंकाळी गर्दीने फुल्ल झाल्याने भाविकांचा महापूर आल्याचे चित्र दिसून आले.

वीर खालसा समूहाची चित्तथरारक प्रात्याक्षिके

मिरवणुकीत शहरातील महाराणा प्रताप मित्रमंडळातर्फे पंजाबमधील वीर खालसा ग्रुपच्या पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. या वेळी युद्धाच्या वेळीचा प्रसंग जळगावकरांनी अनुभवला. तसेच वज्रेश्र्वरी मित्रमंडळाने केरळ येथील तय्यम ढोल-पथक बोलविले होते. या सोबतच प्रत्येक मंडळाने आपापली वेगळी ओळख या मिरवणुकांमधून अधोरेखीत केल्याचे प्रकर्षाने जाणवले. (latest marathi news)

Ganpati visarjan
Radhakrishna Vikhe Patil : मला ५ वर्षे सत्ता देऊन पहा, यावर राधाकृष्ण विखे म्हणाले... सुजय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम

यंदा मूर्त्यांचा आकार मोठा

दर वर्षापेक्षा यंदा गणेश मूर्त्यांचा आकार मोठा असल्याचे प्रकर्षाने जाणवले. प्रत्येकच मंडळात उंच मूर्तीची स्पर्धाच असल्याचे जाणवे. बहुतांश मंडळांकडून भव्य अशा श्रींच्या मूर्तींची स्थपना करण्यात आली होती. गुरुनानक नगरातील बाबा सेवादास मित्रमंडळ मिरवणुकीत २० फूट उंचीची भव्य-दिव्य अशी हनुमानाच्या रुपातील मूर्ती घेत मिरवणुकीत उतरले होते. या मूर्तीने मिरवणुकीतील भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच महर्षी वाल्मिक नगरातील मंडळांनी शोभायात्रेत सजीव आरास साकारमधून सामाजिक संदेश दिला.

पोलिसांचा खडा पहारा

विसर्जन मिरवणुकीत सकाळी आठपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिसांना पॉइंट देण्यात आले होते. तर संपूर्ण मिरवणुकीवर ड्रोनच्या सहाय्याने देखील लक्ष ठेवले होते. त्यामुळे संपूर्ण मिरवणूक निर्विघ्न पार पडली. तसेच मेहरुण तलाव येथे शेवटच्या गणेश मंडळाचे पावणेसात वाजता विसर्जन झाल्याने याठिकाणी २४ तास पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता.

विसर्जनाचे १९ तास

सकाळी सातपासून मेहरुण तलाव परिसरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला सुरवात झाली. सुमारे १९ तासापर्यंत हे विसर्जन सुरू होती. मेहरुण तलावात मंडळांतील मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी चार ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा गणेशमूर्ती उंच असल्यामुळे विसर्जनाला वेळ लागत होता.

त्यामुळे मेहरुणकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंडळांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मेहरून तलाव येथे पाच फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी सार्वजनिक व खासगी अशा २८२ मंडळांनी, गणेश घाटावर पाच फुटांपेक्षा लहान अशा ३०० गणेशमूर्तींचे तर १२ हजार ५०० घरगुती गणेशाचे याठिकाणी विसर्जन करण्यात आले.

...असे आहेत आकडे

मिरवणुकीत सहभागी : ६५ मंडळे

मोठ्या मंडळांची संख्या : २८२

मध्यम मंडळांची संख्या : ३००

घरगुतीचे गणपती विसर्जन : १२,५००

अखेरच्या मूर्तीचे विसर्जन : बुधवारी सकाळी ६:३० वा.

Ganpati visarjan
Buldhana Eknath Shinde Visit: मुख्यमंत्री येण्यापूर्वीच देशी पिस्टल पकडले, मध्यप्रदेश मधून वाहतुकीची शंका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.