Jalgaon Crime : जनावरे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या पथकाकडून रोकडसह संशयितांना अटक

Jalgaon Crime : वृद्ध शेतकरी दांपत्याला धारदार चॉपर गळ्यावर लावून १९ बोकड व सात शेळ्या लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Police Inspector Baban Awad, Sub-Inspector Ganesh Waghmare and team along with the arrested suspects.
Police Inspector Baban Awad, Sub-Inspector Ganesh Waghmare and team along with the arrested suspects.esakal
Updated on

जळगाव : चाळीसगाव हद्दीतील भवाळी गावात वृद्ध शेतकरी दांपत्याला धारदार चॉपर गळ्यावर लावून १९ बोकड व सात शेळ्या लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील संशयितांकडून लुटीतील ऐवज मिळताच पोलिसांचे आभार व्यक्त करताना वृद्ध दांपत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. भवाळी (ता. चाळीसगाव) गावात शेतकरी दांपत्याने गोठ्यात १९ बोकड व सात शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. सप्टेंबरच्या रात्रीच्या सुमारास काही तरुण तेथे आले. (gang of animal thieves was busted by crime branch team )

पाणी मागण्याच्या बहाण्याने प्रवेश करीत त्यांनी दांपत्याच्या गळ्याला सुरा लावला. ठार मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी चारचाकी वाहनात सर्व पशुधन घेत पोबारा केला. चोरट्यांच्या शोधार्थ गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारावर संशयितांचा शोध सुरू केला असता, अट्टल गुन्हेगार चेतन गायकवाड याने त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची बातमी मिळाली. मात्र, संशयित मिळून येत नसल्याने पथक दोन दिवस भवाळी (ता. चाळीसगाव) भागात पाळत ठेवून होते.

Police Inspector Baban Awad, Sub-Inspector Ganesh Waghmare and team along with the arrested suspects.
Jalgaon Crime : उपचारासाठी मुंबईत गेलेल्यांचे मोहनगरातील घर फोडले! मोबाईलसह चांदीचे दागिने, रोकडसह लाखाचा ऐवज लंपास

मोहिमेवर निघण्यापूर्वी बेड्या

संबंधित टोळी गुरुवारी (ता. ३) एकत्र येऊन नव्या लुटीसाठी जाणार असल्याची बातमी मिळताच वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून चेतन गायकवाड व त्याचे साथीदार यांना ताब्यात घेतले.

चौकशीत चेतन गायकवाड याने सांगितले, की त्याने व त्याच्यासोबत असलेले गोरख गायकवाड, बबलू जाधव, गोरख गोकुळ, सोमनाथ गायकवाड, गोकुळ गायकवाड व शंकर मोरे (सर्व रा. भवाळी, ता. चाळीसगाव) यांनी हिंगोणे शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या असल्याची माहिती होती. त्यामुळे त्या सर्वांनी मिळून चारचाकी वाहनाने व मोटारसायकलने त्या ठिकाणी जाऊन झोपलेल्या वृद्ध शेतकऱ्यास धारदार शस्त्र मानेवर ठेवून १९ बोकड व सात शेळ्या सोबत चारचाकी वाहनाने नेऊन विक्री केल्या.

Police Inspector Baban Awad, Sub-Inspector Ganesh Waghmare and team along with the arrested suspects.
Jalgaon Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावे 11 लाखांची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.