पाचोरा : येथील भडगाव रोड भागातील पंचायत समिती कर्मचारी वसाहतीच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्यावतीने कचरा डेपो तयार करण्याचा प्रयत्न ‘सकाळ’च्या वृत्ताने हाणून पाडला आहे. 'सकाळ'मधून रविवारी (ता. २८) अंकात टुडे पानावर 'भडगाव रोडच्या सौंदर्याला कचरा डेपोचा डाग' अशा मथळ्याखाली. (Garbage depot removed from Bhadgaon Road area)
त्रस्त नागरिक व भाविकांच्या प्रतिक्रिया व फोटोसह वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तामुळे पालिका प्रशासनाची कुंभकर्णी झोप मोडली.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळपासूनच पंचायत समिती कर्मचारी वसाहतीच्या परिसरातील कचरा उचलण्याचे काम लगबगीने सुरू केले व हा संपूर्ण परिसर कचरा मुक्त केला. (Latest Marathi News)
यामुळे परिसरातील नागरिक, भाविक, रहिवासी, दुकानदार, व्यापारी कमालीचे आनंदले आहेत. 'सकाळ'च्या वस्तुस्थितीवर आधारित वृत्तामुळेच पालिकेचा कचरा डेपो तयार करण्याचा डाव उधळला गेला असल्याच्या प्रतिक्रिया काही भाविकांनी व्यक्त केल्या.
तसेच पुन्हा या ठिकाणी पालिका कर्मचारी, परिसरातील रहिवासी, दुकानदार, हॉटेल मालक यांनी कचरा टाकू नये, असे आवाहनही केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.