Jalgaon News : धरणगावातील चिखलात फसली घंटागाडी! कर्मचाऱ्यांची कसरत; कृष्ण गीता नगरातील रस्त्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

Jalgaon News : रस्त्यात कचरा संकलन करणारे नगरपालिकेचे वाहन (घंटागाडी) फसल्याचा प्रकार रविवारी (ता.४) कृष्ण गीतानगरात झाला.
Municipal employees pulling out the hourglass stuck in the mud in Krishna Gitanagar.
Municipal employees pulling out the hourglass stuck in the mud in Krishna Gitanagar.esakal
Updated on

धरणगाव : येथील नगरपालिका हद्दीतील गट नंबर ३७५मधील कृष्ण गीता नगरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने चिखलमय व जलमय झालेल्या रस्त्यात कचरा संकलन करणारे नगरपालिकेचे वाहन (घंटागाडी) फसल्याचा प्रकार रविवारी (ता.४) कृष्ण गीतानगरात झाला. दुसरे वाहन बोलवून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी फसलेले वाहन बाहेर काढले. (garbage truck stuck in mud in Dharangaon)

विशेष म्हणजे या भागातील खराब रस्त्यांबाबत नगरपालिकेला वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. त्यानंतरही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्याचाच विपरीत परिणाम म्हणून या रस्त्याने ये-जा करताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे खुद्द नगरपालिकेचेच कचरा संकलन करणारे वाहन (घंटागाडी) या चिखलात फसल्याचा प्रकार रविवारी घडल्याने नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. नगरपालिकेचे कर्मचारी सुधीर पचेरवाल, जितेश पचेरवाल, विशाल पारधी, रत्नाकर सोनवणे, समाधान करंकाळ यांनी दुसरे वाहन बोलविले. (latest marathi news)

Municipal employees pulling out the hourglass stuck in the mud in Krishna Gitanagar.
Jalgaon Rain: पावासाने भुसावळ शहराची वाताहात! अनेकांच्या घरांत पाणी; रस्त्यावर ठिकठिकाणी डबके, बसस्थानकाला तलावाचे स्वरूप

त्यानंतर त्यानंतर दोर बांधून चिखलात फसलेली घंटागाडी बाहेर काढण्यात आली. यावेळी कृष्ण गीता नगरातील नागरिकांनी एकत्र येऊन नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भविष्यात नगरवासीयांसोबत कुठलीही अशी घटना होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर मुरूम टाकावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Municipal employees pulling out the hourglass stuck in the mud in Krishna Gitanagar.
Jalgaon News : रेल्वे बोगींचे डिजिटल बोर्डस् कार्यान्वित करण्याची मागणी; रावेर स्थानकावर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.