Jalgaon Garlic Rate Hike : कडक उन्हामुळे लसूण 220 पार; भाजीपाल्यांचे दर तेजीत

Garlic Rate Hike : शहरासह जिल्ह्यात सध्या कडक उन्ह आहे. मागील महिन्यात पाऊसही झाला होता.
Garlic Rate Hike
Garlic Rate Hikeesakal
Updated on

Jalgaon Garlic Rate Hike : शहरासह जिल्ह्यात सध्या कडक उन्ह आहे. मागील महिन्यात पाऊसही झाला होता. कधी कडक ऊन, तर अवकाळी पाऊस याचा परिणाम ‘लसणा’वर झाला आहे. लसणाचे भाव २२० ते २५० किलोवर गेले आहेत. कडक उन्हामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होत असून, आवकही कमी झाली आहे. परिणामी, सर्वच भाज्या महागल्या आहेत. मागील महिन्यापासून हवामानात सारखे चढ-उतार होत असून, त्याचा परिणाम पालेभाज्यांच्या उत्पन्नावरही झाला आहे. (Garlic Rate Hike 220 per kg and Vegetable prices are on rise )

मागील वर्षी पडलेला अल्प पाऊस व वातावरण बदलामुळे सध्या पालेभाज्या कडाडल्या आहेत. लसूण पुन्हा एकदा २२० ते २५० रुपये किलो झाला आहे. राज्याच्या विविध भागांत होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकावर होत आहे, तसेच वातावरण स्वच्छ न राहिल्यामुळे भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादूर्भाव जाणवत आहे.

परिणामी, भेंडी, काकडी, टोमॅटो, कोबी यांसह आदी फळभाज्या महागल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने लसणाची लागवड कमी झाली आहे. यामुळे लसूण पुन्हा तेजीत आला आहे. पावसाळ्यापर्यंत लसणाचे दर स्थिर राहतील. मात्र, पावसाळ्यात लसणाच्या दरात पुन्हा एकदा तेजी येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका

सध्या राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडे शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने जिल्ह्यात फळभाज्यांची लागवड कमी आहे. सध्या शहरात वाशी, जालना, परभणी, जळगाव जिल्ह्याच्या काही भागांतून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. (latest marathi news)

Garlic Rate Hike
Jalgaon Gold Rates Hike : सोने 12 हजार रुपयांनी महाग! विक्रीत दहा टक्के घट; दरवाढीचा परिणाम

लिंबू महागला

सध्या लिंबू चांगलाच महागला आहे. शहरातील नवी भाजी मंडईत २० रुपयांत चार लिंबू विक्री होत आहेत. कमी पावसामुळे लिंबूचा बहार गळाला होता. यामुळे लिंबू पिकाची फळधारणा कमी राहिली. रसवंती, लिंबू सरबत व शीतपेय विक्रेते सध्या लिंबूची अधिक खरेदी करीत आहेत. उन्हाळ्यात आहारात लिंबाचा समावेश आवश्यक असल्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. पाच रुपयांना एक लिंबू विक्री होत असतानाही ग्राहक संख्या अधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

या भाज्या महाग

सध्या शहरातील भाजीमंडईत जवळपास सर्वच भाज्या महाग झाल्या आहेत. मात्र, टोमॅटो, भोपळा, भेंडी, काकडी, वांगी, चुका, कोबी या भाज्या जास्त महाग झाल्या आहेत. सध्या वांगी ४० रुपये किलो, लसूण २२० ते २५०, बटाटे ३०, कांदे २०, काकडी ५०, टोमॅटो २०, मिरची ६० ते ८०, पत्ता कोबी ४०, भोपळा (१ नग) १०, पालक (१ जुडी) १०, भेंडी ४० ते ५० रुपये किलो आहे.

आंब्याची आवक वाढली

अक्षयतृतीया झाल्यानंतर बाजारात विविध प्रकारच्या आंब्याला मागणी वाढली आहे. बाजारात सध्या ८० रुपयांपासून २५० रुपये किलो आंब्याची विक्री होत आहे. आंब्याचा सिझन संपण्यासाठी केवळ १५ ते २० दिवस शिल्लक राहिल्याने बाजारात आंब्याची आवक वाढली आहे.

''उन्हाची तीव्रता वाढल्याने आवक कमी झाली आहे. यामुळे सर्वच भाजीपाल्यांचे दर तेजीत आहेत. कडक उन्हामुळे भाज्या लवकर कोमजत आहेत. त्यांच्यावर सतत पाण्याचा फवारा मारावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही महिनाभर भाजीपाला स्वस्त होणार नाही.''-गणेश चौधरी, भाजी विक्रेता

Garlic Rate Hike
Jalgaon Garlic Rate : लसूण आवाक्यात; गृहिणींना दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.