Jalgaon Girish Mahajan : खासदारकीत काम चांगले; मग उमेदवारी का नाही? : गिरीश महाजन

Jalgaon News : तुमचे काम चांगले होते, तर पक्षांतर करूनही तुम्ही उमेदवारी का घेतली नाही, असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
Girish Mahajan
Girish Mahajanesakal
Updated on

Jalgaon News : तुमचे काम चांगले होते, तर पक्षांतर करूनही तुम्ही उमेदवारी का घेतली नाही, असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. येथील आदित्य लॉनमध्ये मंगळवारी (ता. १६) झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, स्मिता वाघ. (Jalgaon Girish Mahajan criticized Unmesh Patil in meeting)

आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी खासदार ए. टी. पाटील, मनसेचे जयप्रकाश बाविस्कर, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील आदी उपस्थित होते.

गिरीश महाजन म्हणाले, की पक्षावर निष्ठा ठेवली, म्हणून स्मिता वाघ यांना पक्षाने उमेदवारी दिली. उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारले, म्हणून त्यांनी पक्ष सोडला. दुसऱ्या पक्षात जाऊनही त्यांनी उमेदवारी घेतली नाही. करण पवार यांना पुढे केले.

उन्मेश पाटलांची टीका चुकीची : गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील म्हणाले, की उन्मेष पाटील यांना पक्षांतर करण्याची गरज नव्हती. त्यांनी आता केले आहे. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यांनी व्यक्तिगत टीका करू नये. मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील म्हणाले, की उन्मेष पाटील यांनी उगाच टीका करू नये. आपले तिकीट का कापले गेले, याचा शोध घ्यावा. (latest marathi news)

Girish Mahajan
Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया

संजय पवार, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, स्मिता वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवार बदलणार नाही : महाजन

उमेदवारी बदलाच्या चर्चेवर गिरीश महाजन म्हणाले, की जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवार आता कोणत्याही परस्थितीत बदलणार नाहीत. स्मिता वाघ, रक्षा खडसे याच उमेदवार राहतील. २५ एप्रिलला दोघांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल.

Girish Mahajan
Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.