जळगाव : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र नंतर ते ठाकरे सरकारला टिकवता आले नाही, असे असूनही फडणवीसांना टार्गेट केले जात आहे. आंदोलनकर्ते भाजपचे उमेदवार पाडा, असे जाहीर बोलताय, यावरून काय चाललेय हे कळते. अनेक वर्षे राज्यात सत्ता भोगूनही मराठ्यांना आरक्षण का दिले नाही, याचा जाब खरंतर शरद पवारांना विचारला पाहिजे, असे मत राज्याचे ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. (Girish Mahajan statement on maratha reservation)