गिरीश महाजन,सुनील झंवर यांचे सहकारी रामेश्वर नाईक यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

खंडपीठात युक्तिवाद: ‘मोक्का’चे कलम वाढल्याने अडचण; लवकरच होणार सुणावणी
 Court
Courtesakal
Updated on

जळगाव : जामनेरचे आमदार तथा माजी मंत्री गिरीश महाजन, सुनील झंवर आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यावर नूतन मराठा संचालकांच्या दोन गटांमधील वादात अपहरण करून धमकावल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याची फिर्याद रद्द करण्याच्या याचिकेवर खंडपीठात कामकाज सुरू असून खंडपीठाने याचिका काढून घेण्याबाबत सूचित केले आहे. उर्वरित कामकाज येत्या सेामवारी (ता. २०) रेाजी होणार आहे.

मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी संचालक ॲड. विजय पाटील यांना वर्ष-२०१८ मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाकावर मारहाण केल्याप्रकरणी निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी (ता. ९ डिसेंबरला) गुन्हा दाखल झाला आहे. त्यात माजी मंत्री गिरीश महाजन, सुनील झंवर, रामेश्वर नाईकसह २९ संशयितांविरुद्ध त्यांनी तक्रार दिली होती. संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने संशयितांनी त्यांना पुण्यात बोलावून घेत, अपहरण करुन शिवीगाळ, दमदाटी करत सदाशिव पेठेतील एका घरात डांबून ठेवले. चाकूच्या जोरावर त्यांनी सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी देखील घेतल्याची फिर्याद ॲड. विजय पाटलांनी दाखल केली आहे. यावर गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक या दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेत तक्रार रद्द (एफआयआर स्क्वॅशसाठी) याचिका दाखल केली होती. त्या वर न्या. नितीन जामदार आणि न्या.कोतवाल यांच्या खंडपीठात कामकाज झाले.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद

न्या. नितीन जामदार आणि न्या.कोतवाल यांच्या खंडपीठात आज अंतिम कामकाज होऊन निर्णयाची अपेक्षा हेाती. तत्पूर्वी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पुन्हा एकदा आपला म्हणणे सादर केले. तर, संशयित तानाजी भोईटे, शिवाजी भोईटे यांच्या वतीने अटकेपासून संरक्षण मागण्यात आले. विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी या गुन्ह्यात ९ संशयितांना मोक्काचे कलम लावल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. उर्वरीत कामकाज आता सोमवार (ता.२० डिसेंबर) रोजी कामकाज होणार आहे. फिर्यादी अॅड. विजय पाटील यांच्यावतीने अॅड. नितीन गवारे-पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली.

 Court
पुणे : मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी भावी डॉक्टर बनले चोर

नऊ संशयितांना ‘मोक्का’

दाखल गुन्ह्यात २९ संशयित असून त्यापैकी तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गोकूळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भोईटे व शिवाजी केशव भोईटे अशा नऊ संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच ‘मकोका’प्रमाणे कलम वाढवण्यात आले आहे.

उशिराचा बचाव

गिरीश महाजन यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. केवळ त्यांच्या नावाचा गैरवापर होत असून तक्रारदाराने खोटी कथा तयार केली आहे, शिवाय ३ वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असा दावा महाजन यांच्या वकिलांतर्फे मांडण्यात आला. त्यामुळे एफआयआर रद्द करण्याची मागणी महाजन यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.