भडगाव : गेल्या ३०-४० वर्षांपासून निवडणुका आल्या म्हणजे फक्त आश्वासनाच्या झुलत्या मनोऱ्यावर फिरणाऱ्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर कागदावर आला, तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्यक्षात त्याला गती मिळणार आहे.
त्यामुळे फक्त दिवास्वप्नात असणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात होऊ शकेल, अशी अपेक्षा गिरणापट्ट्यातून व्यक्त होतेय. या प्रकल्पामुळे गिरणापट्टा सिंचनाबाबत समृद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. (Girna belt moving towards water prosperity)