Jalgaon News : सर्वसामान्यांना सोने घेणे आता आवाक्याबाहेर झाले आहे. एक तोळे सोन्याचा शुक्रवारी (ता. १२) दर ‘जीएसटीसह’ ७५ हजार १९० होता, तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. गुढीपाडव्याला सोन्याचा सकाळी दर जीएसटीसह ७३ हजार ५४२ वर (प्रतितोळा) होता. त्यात सायंकाळी एक हजाराची वाढ होऊन सोने ७४ हजार ३६६ रुपयांवर पोचले होते. (Jalgaon Gold price 75 thousand rupees Silver also at 86 thousand wedding budget collapsed)
चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ वर आली आहे. महिन्याभरात आता सात हजारांची वाढ सोन्यात झाली आहे. सोन्यातील दरवाढीचा परिणाम मंगळवारी (ता. ९) ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्म घट झाली होती. यामुळे सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. (latest marathi news)
सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)
तारीख--सोने (प्रतितोळा)--चांदी (प्रतिकिलो)
५ मार्च-- ६४ हजार ३००-- ७३ हजार
२३ मार्च--६६ हजार २००--७५ हजार
२८ मार्च--६६ हजार ३००--७५ हजार
२९ मार्च--६८ हजार २००--७६ हजार
२ एप्रिल--२०२४--६८ हजार ७००--७७ हजार
३ एप्रिल--६९ हजार ४००--७८ हजार
५ एप्रिल--७० हजार ६००--८१ हजार
८ एप्रिल--७१ हजार ८००--८३ हजार
९ एप्रिल--७१ हजार २००--८२ हजार
१२ एप्रिल--७३ हजार--८४ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.