Jalgoan Gold Rate : रशिया- युक्रेनमधील युद्धानंतर इस्त्रायल- पॅलेस्टिन, इस्त्रायल-इराणमधील संघर्षाचा परिणाम जगाच्या पातळीवर युद्धजन्य स्थिती निर्माण करण्यापर्यंत झाला आहे, तर दुसरीकडे चीनने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केल्यामुळे सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढले असून, त्याची लाखाच्या दिशेने वाटचाल होताना दिसतेय. एप्रिलमध्ये लग्नमुहूर्तांची मोठी धूम होती. मे व अर्धा जून असा जवळपास दीड महिना आता मुहूर्त नसल्याने सोन्याच्या भावात काहीशी घसरण होण्याची शक्यता असली, तरी भाव खूप मोठ्या प्रमाणात खाली येण्याची अजिबात शक्यता नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. ( War conditions and China purchase of gold increases )
सोने खरेदीची भारतात क्रेझ
भारतात सोने खरेदीची मोठी क्रेझ आहे. महिलांमध्ये सुवर्ण दागिने घालण्याची आवड आहेच. शिवाय अलीकडच्या काही वर्षांत पुरुष मंडळीही अंगठी, ब्रासलेट, चेन, अशा सोन्याच्या वस्तूंना प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे एक सुरक्षित व चांगली गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याच्या अपेक्षेने सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतोय. ‘अर्ध्या रात्री कामी येणारी गुंतवणूक’ म्हणूनही सोन्याची खरेदीवर लोकांचा भर असतो.
सोन्याची वाटचाल लाखाकडे
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दराने मोठी उंची गाठली. एक-दोन महिन्यांतच भाव एवढ्या प्रमाणात वाढतील, अशी अपेक्षाही नव्हती. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावात दहा हजारांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येते. ६०-६२ हजार रुपये प्रतितोळा असलेले सोने आता ७२ हजारांवर पोहोचले आहे. त्यामुळे अचानक ही भाववाढ का झाली, याबाबत उलटसुलट तर्क लढविले जात आहेत.
भाववाढीमागे अनेक घटक
खरेतर कोणत्याही वस्तूच्या भाववाढीमागे अनेक घटक असतात. त्यातही सोन्याची भाववाढ बहुतांश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर अवलंबून असते. मागणी अधिक, पुरवठा कमी असला की भाववाढ होते, हे सर्वसामान्य गणित आहे. सोन्याच्या भावाबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक घटकांचा परिणाम होतो. (latest amrathi news)
गेल्या दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून दोन वर्षांत सोन्याचे भाव वाढले. आता काही महिन्यांत इस्त्रायल-पॅलेस्टीन युद्ध, इस्त्रायल-इराणमधील संघर्षामुळे जागतिक युद्धजन्य स्थितीही निर्माण झाली आहे. त्यामुळेही सोन्याची भाववाढ झाल्याचे मानले जात आहे.
चीनने खरेदी केले सोने
एरवी चीनसारखा देश सोने खरेदीत कधीही रस दाखवत नव्हता. आता मात्र चीनलाही गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचे वाटणे महत्त्वाचे मानले जाते. चीनने गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले आहे. चीन सरकारने ही कृती केल्यामुळे सोन्याचे भाव गेल्या दोन- चार महिन्यांत दहा-पंधरा हजारांनी वाढल्याचे दिसत आहे.
ही आहेत कारणे
-जागतिक युद्धजन्य परिस्थिती
-चीन बनला सोन्याचा मोठा खरेदीदार
-लग्न सीझनमुळे वाढलेली मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.