Jalgaon Drought News : कीर्तनाचे मानधन गायींच्या पालनपोषणावर खर्च! तालुक्यात चारा छावण्यांची गरज

Jalgaon News : दाहकतेतही वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) व तरवाडे (ता. पारोळा) येथील समर्पण गोशाळा या दोन्ही ठिकाणी असलेले ८०० पेक्षा जास्त गायींचा सांभाळ गोसेवक रविदास महाराज सद्यःस्थितीत करीत आहेत.
goshala
goshalaesakal
Updated on

मेहुणबारे : राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने चाऱ्याअभावी गुरे पाळणे जिकरीचे बनले आहे. अशा दाहकतेतही वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) व तरवाडे (ता. पारोळा) येथील समर्पण गोशाळा या दोन्ही ठिकाणी असलेले ८०० पेक्षा जास्त गायींचा सांभाळ गोसेवक रविदास महाराज सद्यःस्थितीत करीत आहेत. (Jalgaon Gosevak Ravidas Maharaj is taking care of more than 800 cows at Goshala)

विशेष म्हणजे, त्यांना कीर्तनाच्या मोबदल्यात मिळणारे मानधन ते गायींच्या पालनपोषणावर खर्च करीत असल्याने ते खऱ्या अर्थाने गोपालक ठरले आहेत. आजपर्यंत कुठल्याही प्रकारची शासकीय मदत येथे पोहोचली नसून दुष्काळी परिस्थितीत शासनाने चाऱ्यासाठी मदत करावी, अशी मागणी होत आहे.

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) या गिरणा काठालगतच्या गावात वटेश्‍वर आश्रम व महादेवाचे मंदिर आहे. वरसाडे (ता. पाचोरा) येथील रहिवासी असलेले रविदास महाराजांनी येथे सुरुवात एका गायीपासून करीत आज तेथे चारशेच्या आसपास गायी पाळल्या आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच त्यांनी आपले घर सोडले. ब्रम्हचारी असलेल्या रविदास महाराजांना लहानपणापासून कीर्तनाची आवड असल्याने त्यांनी आळंदीत नऊ वर्षे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले.

वीस वर्षांपासून गो शाळा

रविदास महाराजांनी वडगाव लांबे येथील वटेश्‍श्वर आश्रमात गो शाळा सुरू केली. आज या गो शाळेत ४०० च्या वर गायी आहेत. तब्बल वीस वर्षांपासून ते गायींची सेवा करीत आहेत. गायींना चारण्यापासून ते त्यांचे शेण आवरण्यापर्यंतची सर्व कामे स्वतः रविदास महाराज करतात. या आश्रमासह पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे देखील समर्पण गोशाळा आहे. येथेही रविदास महाराजांनी चरशेच्यावर गायींचे संगोपन सुरू ठेवले आहे. (Latest Marathi News)

goshala
Jalgaon District Collector : उमेदवारांनी खर्चाचा हिशोब ठेवावा : जिल्हाधिकारी प्रसाद

रविदास महाराज सध्या येथेच जास्त करुन वास्तव्य करतात. वटेश्वर आश्रमावर त्यांचे शिष्य अमोल महाराज हे गायींचे संगोपन करतात. वडगावला गो शाळेच्या शेजारी थोडीशी शेतजमीन आहे. त्यावर ते नांगर चालवून शेती तयार करीत होते. मात्र आज गायींची संख्या पाहता चाऱ्यासाठी ती देखील अपुरी पडत आहे. यामुळे महाराजांची मोठी धडपड होत आहे.

जळगाव जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या या दोन्ही गो शाळा केवळ रविदास महाराजांमुळेच सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गोशाळेवर रात्री बेरात्री हिस्र प्राण्यांचा धाक असतो. त्यामुळे रविदास महाराज व अमोल महाराज यांचा रात्रभर डोळ्यांत तेल घालून पहारा असतो.

कीर्तनाचे मानधन गायींवर

गोसेवक रविदास महाराज हे कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर ठिकठिकाणी जातात. अनेक सप्ताहांमध्ये त्यांच्या कीर्तनांचे आयोजन केले जाते. त्या बदल्यात त्यांना आर्थिक स्वरूपाचा जे मानधन मिळते, ते सर्वच्या सर्व गायींच्या चारापाण्यावर खर्च करतात. गायीच्या सेवेसाठी त्यांनी जणू आपले सर्वस्व अर्पण केले आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत पशुधन मालक वैतागले आहेत.

goshala
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 14, रावेर मतदारसंघात 24 उमेदवार; माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट

रविदास महाराज मात्र अशाही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने गायीचा सांभाळ करीत आहेत. या गायींमध्ये ज्या गायी दूध देणाऱ्या आहेत, त्यांचे दूध ते काढत नाहीत तर वासरांना पाजतात, हे विशेष. या दोन्ही ठिकाणी अनेक ग्रामस्थांची मोठी मदत होत असते. मात्र ऐवढ्या गायींचे पालनपोषण करणे खूप जिकरीचे झाले आहे.

यासाठी या गोशाळेवर कुणाला काहीही मदत करायची असेल तर ९८५०६०८५३४ या क्रमांकावर संपर्क साधून गायींच्या चाऱ्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन रविदास महाराजांनी केले आहे.

"दुष्काळी परिस्थितीत अशा विषयांकडे सध्या कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. गाई शिवाय जंगल, जल, जीवन, जमीन व संपूर्ण जग वाचू शकत नाही. सृष्टी संतुलनासाठी आज सर्वांत विशेष गाय हाच घटक आहे. मी ब्रह्मचारी असल्याने पैसा कमवू तरी कोणासाठी गो शाळेतच मी गायींची सेवा करतो. तेच माझे कुटुंब असून, त्यातच मला समाधान लाभते." - गोसेवक रविदास महाराज, वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) व समर्पण गोशाळा तरवाडे (ता. पारोळा)

goshala
Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.