E-Peek Pahani : आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती शासनाला देण्यासाठी मागील चार वर्षांपासून ई- पीक पाहणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यंदा ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत, तसेच पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. १ ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. (Government assistance only after E-Peek inspection August 15 deadline )
१५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ॲपद्वारे खरिपातील पिकांची नोंद करून घ्यावी. राज्य शासनाकडून २०२१ पासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंद ॲपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या वर्षी योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता. नंतरच्या दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती झाल्यामुळे ई- पीक पाहणीला प्रतिसाद मिळत आहे. यंदाही ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. (latest marathi news)
शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा
जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सरकारने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकरी शेतातील पिकांची नोंद करू शकतील. तलाठी व कृषी सहायकांच्या स्तरावर नोंदणी करता येईल.
ई-पीक पाहणीचे महत्व
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते. आता ई-पीक पाहणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे, तसेच विमा कंपन्यांकडूनही ई-पीक पाहणच्या अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येते. यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असतानाही ई-पीक पाहणी न झाल्याने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरविण्यात येते. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करता येईल. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.