Jalgaon News : घर घ्या, दर तेच! रेडिरेकनरमुळे दिलासा

Jalgaon News : आर्थीक वर्षाच्या अखेरच्या दिवशी शासनाने रेडिरेकनर (वार्षिक बाजारमूल्य दर) दरात कुठलीही वाढ न करण्याचा अध्यादेश जाहीर सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
House
House esakal
Updated on

Jalgaon News : आर्थीक वर्षाच्या अखेरच्या दिवशी शासनाने रेडिरेकनर (वार्षिक बाजारमूल्य दर) दरात कुठलीही वाढ न करण्याचा अध्यादेश जाहीर सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे बांधकाम साहित्याच्या दरात वाढ नाही. त्यामुळे केल्याने घराचे स्वप्न पहाणाऱ्या घरांच्या स्थिर किंमती आणि बाजारभावामुळे दिलासा मिळणार आहे. जळगावच्या चारही बाजूंनी महामार्गाचे चौपदरीकरण काही ठिकाणी होत आहे. (Jalgaon government not made any increase in annual market rate so there is no increase in price of construction materials)

काही ठिक़ाणी झाले आहे. औरंगाबाद, नाशिक, नागपूरला जाण्यासाठी असलेला महामार्गामुळे या शहरांशी जळगावशी कनेक्टिव्हिटि वाढत आहे. यामुळे जळगावमधील घरांना मोठी मागणी आहे. कोरोनानंतरच्या कालावधीत जळगाव शहर झपाट्याने बदलतय. उड्डाणपुलासारखी मोठी दळण-वळणाची साधने उभी राहत आहेत.

त्यामुळेच जळगाव शहरात आपले स्वतःचे घर असावे, हे स्वप्न प्रत्येकजण उराशी बाळगून आहे. गेल्या वर्षभरात लोखंड, सिमेंट, वाळू, वीट या बांधकाम साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. शासनाने यंदा २०२४-२५ वर्षासाठी रेडिरेकनरच्या उरात वाढ केलेली नाही.त्यामुळे घरांच्या किमती देखील वाढलेल्या नाही.यामुळे घर घेणे आता अधिक सोपे होणार आहे.

कोरोनाकाळात अनेकांचे घर घेण्याची स्वप्न अपूर्ण राहिले हे स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना चांगली संधी असल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात. आज रोजी शहरात ३०० ते ५०० घरे बांधून तयार आहेत, तर तेवढ्याच घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे घरे घेताना अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

६ ते ८ टक्के होता दर

कोणत्याही जमिनीचे किंवा घरांचे व्यवहार करताना रेडीरेकनर (चालू बाजारमुल्य दर) चे दर पाहिले जातात. २०२२-२३ मध्ये राज्य शासनाने रेडिरेकनर दरात सरासरी पाच टक्के वाढ केली होती. यात ग्रामीण भागासाठी ६.९६ टक्के, नगरपालिका क्षेत्रात ३.६३ टक्के, महापालिका क्षेत्रासाठी ८.८० टक्के वाढ केली होती. तेच दर यंदा कायम राहणार आहेत. यामुळे घरे घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (latest marathi news)

दृष्टिक्षेपात...

बांधून तयार -६००

बांधकाम सुरू--४००

परवडणारी घरे --७० टक्के

महागडी घरे-३० टक्के

"रेडिरेकनरच्या दरात वाढ न झाल्याने घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून घरांच्या किंमती वाढलेल्या नाहीत. परंतु शासनाने सबसिडी बंद आहे. ती पुन्हा सुरू करावी. बँकांनी गृहकर्जात दरात केलेली वाढ कमी करावी. यामुळे सर्वसामान्यांना घर घेतांना दिलासा मिळेल." - अनिश शाह, उपाध्यक्ष, राज्य क्रेडाई

कितीही मजली उंच इमारती बांधता येतील

शहरात महापालिकेची १७ मजली सोडली तर ७ ते ८ मजलीपर्यंत इमारती बांधण्यात आल्या आहेत. आता नवीन कायद्यानूसार मुंबई शहर सोडले तर कितीही उंच इमारती बांधता येणार आहे.

अनुदान बंद

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर खरेदीदारांना दोन लाख ६७ हजार रुपयांची सबसिडी मिळत होती. सामान्ऱ्यांना या सबसिडीचा मोठा हातभार लागला, अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. परंतु ही सबसिडी आता बंद झाल्याने सर्वसामान्य घर खरेदीदारांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

असे आहेत बांधकाम साहित्याचे दर

* लोखंड --६० रूपये किलो

* सिमेंट -३२५ रूपये गोणी

* वाळू-४५०० रूपये ब्रास

* क्रश सॅण्ड ३००० रुपये ब्रास

* वीट- १० ते १३ रुपये एक (६ इंची)

"२०२३-२४ चे वार्षिक दर विवरण पत्र कोणताही बदल न करता २०२४-२५ मध्ये सूरू ठेवण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी दिले आहेत. यामुळे रेडी रेकनरच्या दरात यंदा वाढ झालेली नाही."- सुनिल पाटील मुद्रांक जिल्हाधिकारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.