Jalgaon News: ठराविक शिक्षक तुपाशी तर अनेकजण राहणार उपाशी; सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्त्याबाबत शासनाचे दुटप्पी धोरण

Jalgaon : सातवा वेतन आयोगाचा नियमित पाचवा हप्ता जूलै २०२४ च्या वेतनासोबत देण्याचे शासनाने परिपत्रक जारी केले.
Seventh Pay Commission
Seventh Pay Commissionesakal
Updated on

Jalgaon News : सातवा वेतन आयोगाचा नियमित पाचवा हप्ता जूलै २०२४ च्या वेतनासोबत देण्याचे शासनाने परिपत्रक जारी केले. मात्र याचा फायदा नऊ लेखाशीर्ष अंतर्गत असलेल्या शिक्षकांना होणार आहे. परिणामी, काही शिक्षक कर्मचारी तुपाशी तर काही उपाशी राहणार आहे. असा दुजाभाव पाहायला मिळणार असल्याच्या तक्रारी आहेत. माध्यमिक शिक्षण संचालनालयाने मान्यताप्राप्त १०० टक्के खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील निवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन २०२४-२५ मध्ये सातवा आयोगाचा पाचवा हप्ता देण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर केले आहे. (Government two pronged policy regarding fifth installment of Seventh Pay Commission )

सद्यःस्थितीत मंजूर अनुदानाच्या ४२ टक्के अनुदान जूलै अखेरच्या खर्चासाठी वितरित करण्यात आले. तसेच जुलै अखेर पर्यतचे नियमित वेतन देण्याच्या सूचना केल्या आहेत. एका बाजूला शासन परिपत्रकाद्वारे सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता देण्याचे कळविते तर त्यानंतर काही दिवसानंतर निधी नसल्याचे कारण देत काहींना या हप्त्यापासून वंचित ठेवणार आहे. या दुटप्पी धोरण पाच लेखाशीर्ष अंतर्गत असलेल्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. अशी प्रमुख तक्रार आहे. (latest marathi news)

Seventh Pay Commission
Jalgaon News : मोकाट जनावरांची शेतशिवारात नासधूस; शेतकरी हैराण

हे शिक्षक तुपाशी

क्षेत्रिय स्तरावरून सन २०२४-२५ मधील खर्चाची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार लेखाशिर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३७९, २२०२०५७६, २२०२०५४९, २२०२०५३९, २२०२०५५८, २२०२०४६९,२२०२०५०२ मध्ये वेतन घेणा-या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे जूलै २०२४ चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला १,२,३,४ था हप्ता सह अदा करणे शक्य असल्याने या लेखाशिर्षमध्ये वेतन घेण्याऱ्या पात्र शिक्षकांना जूलै २४ चे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात येणार आहे.

हे शिक्षक राहणार उपाशी

लेखाशिर्ष २२०२३३६१, २२०२०५११, २२०२१९०१, २२०२१९४८, २२०२एच९७३ मध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्याने भागविणे क्रमप्राप्त असल्याने अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार ७ वा वेतन आयोग फरकाच्या हप्त्याबाबत नंतर स्वतंत्र सूचना देण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी कळविले आहे.

Seventh Pay Commission
Jalgaon News : घुमावलला माजी सरपंचाची उचलले टोकाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.