Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेचं मैदान अन्‌ राजकारणातील दिल, दोस्ती, दुनियादारी

Lok Sabha Constituency : जिल्ह्यात या वेळी झालेली लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या घटना, प्रसंग आणि वादांनी गाजली.
Unmesh Patil, Karan Pawar, Dr. Satish Patil, Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Unmesh Patil, Karan Pawar, Dr. Satish Patil, Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patilesakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Constituency : जिल्ह्यात या वेळी झालेली लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या घटना, प्रसंग आणि वादांनी गाजली. या निवडणुकीचे अनेक पैलूही गेल्या दोन महिन्यांतून समोर आले. निवडणुकीच्या निमित्ताने पक्के मित्र दूर गेले. काहींनी मैत्री मनापासून निभावली. काहींनी नातेसंबंधांमधील दुरावा कमी करुन ते जोपासले तर काहींनी मैत्री, नातेसंबंधांच्या पलिकडे जाऊन पक्षनिष्ठेचा आदर्श घालून दिला. ( ground of Lok Sabha and heart of politics friendship worldliness in political leader )

हे करत असताना कुणी मनाचं ऐकलं, कुणी दोस्तीशी प्रामाणिक राहिलं तर कुणी व्यवहार पाहत दुनियादारीचा अवलंब केला आणि अशा उदाहरणांनी जळगाव जिल्ह्यात राजकारणातील ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’चा अनुभव आला. निवडणुकीतील घटक, स्वरुप, रचना ह्या प्रत्येकवेळी बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही नेहमीच वेगळे आयाम घेऊन येते आणि त्यातून पुढच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या बदलांचे संकेतही देऊन जाते.

त्यामुळे निवडणूक अगदी ग्रामपंचायतीची असो, पालिकांची, विधानसभा किंवा लोकसभेची असो. त्या प्रत्येक निवडणुकीचा बाज वेगळा असतो, तिचे परिणाम वेगळे असतात. तसे काही परिणाम या निवडणुकीतूनही जळगाव जिल्ह्यातील दोन्ही रावेर व जळगाव मतदारसंघातून पाहायला मिळाले.

उन्मेश पाटील- करण पवार मैत्री

जळगाव लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीच्या निमित्ताने मोठे फेरबदल झाले. विद्यमान खासदार उन्मेश पाटलांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी सुरवातीला पक्षनिष्ठेची भाषा केली आणि काही दिवसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत शिवबंधन हाती बांधले. ते एकटेच गेले नाहीत, सोबत त्यांचे जवळचे मित्र व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना घेऊन गेले आणि स्वत: उमेदवारी न करता पवारांच्या गळ्यात ती माळ टाकली.

Unmesh Patil, Karan Pawar, Dr. Satish Patil, Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभेतील वाढलेला टक्का कुणाला ठरणार फायदेशीर?

विशेष म्हणजे, पक्ष, चिन्ह व उमेदवार नवीन असूनही उन्मेश पाटलांनी स्वत:ला निवडणूक प्रचारात मित्रासाठी अक्षरश: झोकून दिले व लढत तुल्यबळापर्यंत आणून ठेवली. जळगाव मतदारसंघात जवळच्या काही मित्रांनी अन्य पक्षात असूनही छुप्या पद्धतीने करण पवारांचा प्रचार केल्याचे सर्वश्रुत आहे. मैत्री जोपासताना त्यांनी पक्षनिष्ठेला दूर ठेवल्याची काही उदाहरणेही समोर आली आहेत.

नातेसंबंधातील दुरावा दूर

या निवडणुकीच्या निमित्ताने नातेसंबंधांचा विषयही चर्चेचा ठरला. जळगाव लोकसभा मतदारसंघात ज्या काही राजकारणातील प्रभावी व्यक्ती आहेत, त्यांचे जिल्ह्याच्या ह्या पश्‍चिम भागात बऱ्याच गावांमध्ये नातेसंबंध आहेत. उमेदवार करण पवार हे पारोळ्यातले. ते भाजपत होते. त्यांचे काका माजी मंत्री डॉ. सतीश पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते. सुरवातीपासूनच काका- पुतण्याचे कधी जमले नाही. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून करण पवारांना डॉ. सतीश पाटलांनी नात्यातील दुरावा दूर करुन मनापासून मदत केली.

नाराजी, नातेसंबंध दूर ठेवत पक्षनिष्ठेचे दर्शन

रावेर मतदारसंघात भाजपने सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीवरुन भाजपत अंतर्गत नाराजीनाट्यही पाहायला मिळाले. काही पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली, काहींनी राजीनामे दिले. मात्र, भाजपच्या संस्कृतीत हा प्रकार बसत नाही म्हणून अखेरीस पक्षनिष्ठा म्हणून ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारात उतरले.

Unmesh Patil, Karan Pawar, Dr. Satish Patil, Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Jalgaon Lok Sabha Constituency : चुरशीच्या लढतीत रक्षा खडसेंना किंचित ‘ॲडव्हान्टेज’

माजी मंत्री एकनाथ खडसेंनी सुनेच्या प्रचारार्थ भाजपत वापसीची भूमिका जाहीर केली आणि रक्षा खडसेंचा प्रचारही केला. दुसरीकडे, त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी नणंद या नात्यापेक्षा पक्षनिष्ठेला महत्त्व देत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी प्रचारात सहभाग घेतला.

वैर विसरुन मित्रपक्षाचे कर्तव्य

चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार. ते सध्या शिंदेंच्या शिवसेनेशी संलग्न आहेत. खडसे परिवाराशी पाटलांचे शत्रुत्व लपून राहिलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत रक्षा खडसेंचा प्रचार ते करतील का असा प्रश्‍न होता. सुरवातीला ते प्रचारापासून दूर होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली. पाठोपाठ पालकमंत्री गुलाबराव पाटीलही त्यांना भेटायला गेले. रक्षा खडसेंनीही त्यांची भेट घेऊन विनंती केली. आणि त्यांनीही प्रचाराच्या अंतिम टप्प्यात का होईना महायुतीतील घटक म्हणून प्रचारात सहभागाचे कर्तव्य निभावले.

Unmesh Patil, Karan Pawar, Dr. Satish Patil, Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Jalgaon Lok Sabha Constituency : मंगेश चव्हाण- उन्मेष पाटलांची लागली कसोटी; चाळीसगावकडे जिल्ह्याचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.