Gulabrao Patil : कारभार सुधारण्याचे वीज कंपनीला आदेश : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon News : जिल्हा नियोजनच्या निधीमधून मागील ५ वर्षांत सुमारे १ हजार ४०० एवढी विक्रमी रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) देण्यात आले.
Guardian Minister Gulabrao Patil giving instructions to Mahadistribution officers.
Guardian Minister Gulabrao Patil giving instructions to Mahadistribution officers.esakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा नियोजनच्या निधीमधून मागील ५ वर्षांत सुमारे १ हजार ४०० एवढी विक्रमी रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) देण्यात आले. हे सगळे देऊनही वेळेत कामे होत नसतील, तर नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होते. ‘महावितरण’ने आपल्या कामात झपाट्याने बदल करावा आणि जिल्ह्यातील सगळी प्रलंबित कामे पूर्ण करावीत. (Guardian Minister Gulabrao Patil Order to power company to improve governance)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या डीपीसाठी वितरण पेट्या, कटआउटचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिल्या. जिल्ह्यातील ‘महावितरण’च्या प्रश्नासंदर्भात अजिंठा विश्रामगृहात सोमवारी (ता. २२) झालेल्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता अनिल महाजन, ‘महाजनको’चे मुख्य अभियंता मोहन आव्हाड उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, की ‘महावितरण’च्या तारांची चोरी होत आहेत. या गुन्ह्यात ताबडतोब गुन्हे नोंदवा.

यावर आळा बसविण्यासाठी मोठी कारवाई करावी. जिल्ह्यातील ३६० ठिकाणी जलजीवन योजनेची कामे झाली आहेत. त्यांना तत्काळ वीज जोडण्या द्याव्यात. मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दुरगामी परिणाम करणारी योजना असून, त्याला गती द्यावी. सध्या पावसाळा सुरू आहे. गावागावांत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे त्या अधिक धोकादायक आहेत. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil giving instructions to Mahadistribution officers.
Jalgaon Banana News : केळीचे भाव लिलाव पद्धतीने जाहीर करण्यासाठी 30 ला बैठक!

त्या तत्काळ दुरुस्त करून घ्याव्यात. जीर्ण झालेले वीजखांब बदलण्याची कार्यवाही करावी. जिल्ह्यात वीजेमुळे मृत झालेल्यांना, गंभीर दुखापत झालेल्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असे आदेशही पालकमंत्री पाटील यांनी दिले. आमदार भोळे, आमदार सावकारे, आमदार पाटील यांनी ‘महावितरण’संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली.

शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी प्रकल्प जिल्ह्यात मंजूर केले आहेत. त्या प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा उद्‌घाटन स्थानिक आमदारांना सोबत घेऊन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

Guardian Minister Gulabrao Patil giving instructions to Mahadistribution officers.
Jalgaon News : चोपड्यात रुग्णालयातील कामकाज वादात; एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी तर दुसऱ्यांवर कारवाईचा बडगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.