Guardian Minister Gulabrao Patil : मागचे-पुढचे काढण्यापेक्षा काय चांगले करतोय ते सांगा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon News : कुणाचे मागचे, पुढचे काढण्यापेक्षा आपण काय चांगले करतोय, ते सांगा.. या शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा दूध संघाच्या कारभारावर हल्ला चढविला.
Guardian Minister Gulabrao Patil speaking at a workshop held on Saturday of milk producer organizations in various talukas of the district.
Guardian Minister Gulabrao Patil speaking at a workshop held on Saturday of milk producer organizations in various talukas of the district.esakal
Updated on

Jalgaon News : सहकार क्षेत्रात आम्ही मोठ्या अपेक्षेने आलो. दूध संघ वाचावा अशी आमची इच्छा आहे. दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमन यांनी दूध संघाबाबत विविध अडचणी व तक्रारींचा पाढा वाचला. शेतकऱ्याचे जादा दूध घेणार नाही ही हुकूमशाही चालणार नाही. शेतकऱ्याच्या दुधाला आधी प्राधान्य द्या.. दूध संघाच्या कारभारात अनेक गफलती आहेत.

कुणाचे मागचे, पुढचे काढण्यापेक्षा आपण काय चांगले करतोय, ते सांगा.. या शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा दूध संघाच्या कारभारावर हल्ला चढविला दूध उत्पादक शेतकऱ्यांना मी न्याय मिळवून देऊ शकत नसेल तर दूध संघाचा राजीनामा देईल, असा इशाराही दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामांमधील गैरव्यवहाराबाबत पालकमंत्र्यांनाच घेरले असता पाटलांनीही दूध उत्पादक संस्थांच्या बैठकीत थेट दूध संघाच्या कारभारावर हल्ला चढवत मंगेश चव्हाणांचा ‘हिशोब’ चुकता केल्याचे दिसून आले.

जिल्हा दूध संघाशी संलग्नित सात तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमनची कार्यशाळा शनिवारी पार पडली. या कार्यशाळेत दूध उत्पादक संस्थांनी दूध संघाच्या काराभाराविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. त्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघाचे संचालक आणि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil speaking at a workshop held on Saturday of milk producer organizations in various talukas of the district.
Jalgaon News : एरंडोलला योजनांची 630 प्रकरणे मंजूर! समितीच्या बैठकीत निर्णय

मिल्क-ई सुविधा ॲप

पालकमंत्री म्हणाले की, दूध उत्पादक संस्थेच्या कारभारावर दूध संघाचे यश अवलंबून आहे. दुग्ध व्यवसाय वाढला तरच दूध उत्पादक संस्था व दूध संघ टिकेल. यासाठी समन्वयातून काम करण्याची गरज आहे. गोकूळ दूध संघाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मराठीत मिल्क ई सुविधा ॲप तयार करता येईल का? यावर दूध संघाने विचार करावा जेणेकरून शेतकरी आणि दूध उत्पादकांना अद्ययावत सुविधा मिळतील यात दुधाची गुणवत्ता आणि त्याच्या मोजमापाची माहिती दूध संस्थांना तत्काळ मिळेल. या ॲपद्वारे पशुखाद्यासह इतर सुविधांची नोंदणीही करता येईल.

दूध संघाच्या कारभाराविषयी नाराजी

यावेळी विविध गावांमधील दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमन यांनी येत असलेल्या अडचणींबाबत म्हणणे मांडले. काहींनी लिटरप्रमाणे अनुदान मिळत नाही. जिल्ह्यात दूध संघाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली यात दुधाची सातत्याने होत असलेली घट व फॅट कमी लागते.

त्यामुळे दूध उत्पादकांचे होणारे नुकसान, मिळणारे पशुखाद्य हे खराब आहे, सांगितले जाते की, दूध उपदान वाढवा आणि संघाचे अधिकारी हे जास्त दूध खरेदी करण्यास नकार देते. दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून संघ दूध खरेदी करतो. एकीकडे हजारापेंक्षा अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे.

Guardian Minister Gulabrao Patil speaking at a workshop held on Saturday of milk producer organizations in various talukas of the district.
Jalgaon News : पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम प्रामाणिकपणे करा : विधानसभा निरीक्षक बोरसे

चेअरमन यांची बैठकीला दांडी

जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमनच्या कार्यशाळेला जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण हे गैरहजर राहिले. व्यासपीठावर संचालक संजय पवार, अरविंद देशमुख, शामल झांबरे, रमेश पाटील यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. चेअरमन मंगेश चव्हाण यांच्या गैरहजेरीची कार्यशाळेत जोरदार चर्चा होती.

संचालकांना कानपिचक्या

जिल्हा दूध संघाची सत्ता दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी मिळविली आहे. कुणाचे मागचे-पुढचे काढण्यापेक्षा आपण काय नवीन करीत आहोत ते सांगा, अशा कानपिचक्याही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. तुम्ही शिकलेले आहात म्हणून तुम्हाला चेअरमन केले, तुम्ही दूध उत्पादकांना न्याय दिला पाहिजे असा टोलाही पालकमंत्र्यांनी लगावला.

Guardian Minister Gulabrao Patil speaking at a workshop held on Saturday of milk producer organizations in various talukas of the district.
Jalgaon News : चाळीसगाव आगाराला पावला विठोबा! आठवडाभरात 29 लाखांचे उत्पन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.