जळगाव : महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीच्या बूथचे सूक्ष्म नियोजन करून एकजुटीने जबाबदारी पार पाडा. विरोधी उमेदवार कोण यापेक्षा महायुती डोळ्यासमोर ठेवा. महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील आहे, असे समजून काम करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांनी विरोधकांना चिमटे घेत टोलेही लगावले. येथील आदित्य लॉनमध्ये जळगाव तालुक्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Gulabrao Patil statement of Plan of booth meticulously )