Jalgaon News : भेदभाव न करता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न : पालकमंत्री पाटील

Jalgaon : डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरणाला आपण प्राधान्य दिले असून उर्वरित स्मशानभूमी बांधकाम व स्मशानभूमी पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
Guardian Minister Gulabrao Patil laying the groundwork for various development works
Guardian Minister Gulabrao Patil laying the groundwork for various development worksesakal
Updated on

Jalgaon News : आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच शेतकरी व जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी झटत आहे. कोणताही भेदभाव न बाळगता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळेच कार्यकर्ते आणि जनता माझ्या सोबत आहे. मतदारसंघातील शेतीचे व वर्दळीच्या वाहतुकीचे रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरणाला आपण प्राधान्य दिले असून उर्वरित स्मशानभूमी बांधकाम व स्मशानभूमी पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (Jalgaon Guardian Minister Patil statement Efforts to achieve all round development without discrimination)

ते अवचित हनुमान मंदिर सभागृहात तालुक्यातील, नांद्रा, आवार, तुरखेडा, धामणगाव आणि विदगाव या गावांमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. रिधुर येथे कानळदा ते रिधूर् रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी व सभागृह, काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा योजना, अवचित हनुमान मंदिर परिसरात भक्तनिवास काँक्रिटीकरण.

संरक्षण भिंत वपेव्हिंग ब्लॉक बसवणे, नांद्रा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत ममुराबाद ते नाद्रा रस्त्याचे डांबरीकरण, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम आदी कामांचे भुमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

Guardian Minister Gulabrao Patil laying the groundwork for various development works
Jalgaon News : हुकूमशहा मोदीविरोधात ताकदीने सामना करा : उध्दव ठाकरे

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, पंचायत समिती माजी सभापती ललीताताई पाटील - कोळी , जनाआप्पा कोळी, सर्व सरपंच - उपसरपंच -राजेंद्र कोळी, मुरलीधर कोळी, चुडामण कोळी, भगवान कुंभार, नारायण पाटील, गोकुळ कोळी आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन जनाआप्पा कोळी यांनी केले. आभार शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राजेंद्र चुव्हाण यांनी मानले.

Guardian Minister Gulabrao Patil laying the groundwork for various development works
Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात मतदार संख्येत 18 हजारांची वाढ; आता 35 लाखांवर मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.