Jalgaon Gulabrao Patil : निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री पाटील

Jalgaon Gulabrao Patil : आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी.
Guardian Minister Gulabrao Patil with beneficiaries under National Family Benefit Scheme
Guardian Minister Gulabrao Patil with beneficiaries under National Family Benefit Schemeesakal
Updated on

Jalgaon Gulabrao Patil : आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबानी स्वत: खंबीर होऊन आपल्या पुढच्या पिढीतील लेकरांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबावरच हे सावट दूर करणे आवश्यक आहे. आपल्यासोबत आम्ही आहोत, निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Jalgaon Guardian Minister Patil statement Government is committed to support destitute)

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील तीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. तर २१ महिला व पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत तालुक्यातील २१ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ४ लाख २० हजारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्याबाबतचे धनादेश पात्र उपस्थित लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

यातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ देण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी महसूल विभागाला दिले. धरणगाव पालिका सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी प्रास्ताविकात योजनेची माहिती विशद केली. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कंखरे यांनी सूत्रसंचालन केले.

तर गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, सी. बी. देवराज, महसूल सहायक गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, विजय महाजन, वासुदेव चौधरी, प्रिया इंगळे, भारती चौधरी, पुष्पा पाटील रवींद्र कंखरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil with beneficiaries under National Family Benefit Scheme
Jalgaon Lemon Rates Hike : लिंबाच्या दरात वाढ; भाजीपाला स्थिर; गारपीट, ‘अवकाळी’मुळे आवक मंदावली

तालुक्यातील पात्र २१ लाभार्थ्यांना लाभ

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी असे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी असे आम्रपाली साळुंखे (पाळधी खुर्द), कोकिळाबाई कुंभार, मंगलाबाई जोशी, (पाळधी बुद्रुक), संगीता मोरे, रंजना पारधी, कल्पना मोरे (धरणगाव), मंगला मोरे, यमुनाबाई मोरे (साळवा).

उषा पाटील (हिंगोणे बुद्रुक), सुमन मोरे (खर्दे बुद्रुक), रेखा पाटील (कल्याणे खुर्द), अलका पाटील (आव्हाणी), भारती शिरसाट, पूनम मिस्तरी (वाघळूद खुर्द), अलका पाटील (धार), ललिता पाटील (भवरखेडा), मीना गोधळे (गारखेडा), जयश्री खैरनार (शेरी), सखू भिल (दोनगाव बुद्रुक), देवका भिल (कल्याणे बुद्रुक), संगीता कोळी (रोटवद), असे पात्र लाभार्थी असून, यातील उपस्थितांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

Guardian Minister Gulabrao Patil with beneficiaries under National Family Benefit Scheme
Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रक्षा खडसेंच्या उमेदवारीने ‘राष्ट्रवादी’समोर पेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()