Gulabrao Patil : नशिराबादला पुढील टप्प्यात ‘स्मार्ट सिटी’साठी प्रयत्न : पालकमंत्री पाटील

Gulabrao Patil : नशिराबादला आतापर्यंत सुमारे १८३ कोटींचा निधी उपलब्ध करून येथील सर्वांगीण, सर्वसमावेशक विकास साधला आहे.
Guardian Minister Gulabrao Patil, former Sarpanch Vikas Patil, Lalchand Patil etc. on the occasion of Bhoomipuja for various works including water supply scheme.
Guardian Minister Gulabrao Patil, former Sarpanch Vikas Patil, Lalchand Patil etc. on the occasion of Bhoomipuja for various works including water supply scheme.esakal
Updated on

जळगाव : नशिराबादला आतापर्यंत सुमारे १८३ कोटींचा निधी उपलब्ध करून येथील सर्वांगीण, सर्वसमावेशक विकास साधला आहे. ग्रामविकासात विघ्न आणणाऱ्यांना झुगारून विकासकामे करीत राहणार असून, पुढील टप्प्यात नशिराबादला स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्नशील असून, पुनर्वैभव प्राप्त होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. नशिराबादला बसस्थानक चौक येथे आयोजित ५७ कोटींची पाणीपुरवठा योजना आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन शुक्रवारी (ता. ११) झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. (Guardian Minister Patil statement of Efforts to make Nashirabad Smart City in next phase )

जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सपकाळे, शहरप्रमुख विकास धनगर, जितेंद्र महाजन, डी. डी. माळी, युवासेनेचे चेतन बऱ्हाटे, सुनील महाराज, लेवा समाजाध्यक्ष प्रकाश खाचणे, जैन समाजध्याक्ष महावीर जैन, दिनेश जैन यांच्यासह नशिराबाद परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, पदाधिकारी शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil, former Sarpanch Vikas Patil, Lalchand Patil etc. on the occasion of Bhoomipuja for various works including water supply scheme.
Gulabrao Patil : राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान महत्त्वाचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रास्ताविकात मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार व विविध विकास कामांचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन उपशिक्षक बंडू खंडारे यांनी केले. आभार माजी सरपंच विकास पाटील यांनी मानले. माजी सरपंच विकास पाटील यांनी, पालकमंत्र्यांनी १८३ कोटी निधीतून मंजूर केलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

..अशी आहेत विकासकामे

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत नशिराबाद शहरासाठी वाघूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, डीपीडीसीच्या नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून २४ कामे, नगरोत्थान अंतर्गत १४ कामे, नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत ८ कामे या कामांचे भूमिपूजन तर नगरोत्थान योजनेंतर्गत ७ कामे, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ९ कामे, दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १ काम,अशा कामांचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.

Guardian Minister Gulabrao Patil, former Sarpanch Vikas Patil, Lalchand Patil etc. on the occasion of Bhoomipuja for various works including water supply scheme.
Gulabrao Patil News: पत्रकारानं प्रश्न विचारला, मंत्री गुलाबराव पाटलांचं टाळकंच फिरलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.