Jalgaon : उद्योजकांसाठी उद्योग भवन, ट्रक टर्मिनल वरदान ठरेल : पालकमंत्री पाटील

Jalgaon : ट्रक टर्मिनल हे व्यापारी आणि छोटे-मोठे उद्योगांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. याचा उद्देश केवळ वाहतूक सोयीसाठी नसून, हे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे.
Guardian Minister Gulabrao Patil, MP Smita Wagh, MLA Suresh Bhole etc. while unveiling the cornerstone during the Bhoomi Puja of Udyog Bhawan, Truck Terminus site.
Guardian Minister Gulabrao Patil, MP Smita Wagh, MLA Suresh Bhole etc. while unveiling the cornerstone during the Bhoomi Puja of Udyog Bhawan, Truck Terminus site.esakal
Updated on

जळगाव : ट्रक टर्मिनल हे व्यापारी आणि छोटे-मोठे उद्योगांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. याचा उद्देश केवळ वाहतूक सोयीसाठी नसून, हे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. उद्योग भवनामुळे व्यापाराच्या नोंदणी, परवानग्या आणि इतर औद्योगिक प्रक्रियेतील किचकट कामे सुलभ होतील, तर ट्रक टर्मिनन्समुळे माल वाहतूक आणि साठवणीतील अडचणी दूर होतील. या दोन्ही गोष्टींमुळे व्यापारी आणि लघु उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल हे वरदान ठरेल, असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी व्यक्त केला. (Guardian Minister Patil statement of Udyog Bhawan truck terminal will be boon for entrepreneurs)

जिल्हा उद्योग केंद्रात ४० कोटींचे उद्योग भवन व ट्रक टर्मिनल भूमिपूजन बुधवारी (ता.९) झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, डीआयसीचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर. आर. डोंगरे, व्यवस्थापक प्रशांत पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, लघु भारतीचे अध्यक्ष समीर साने, जिंदा असोसिएशनचे रवी लढ्ढा, मॅट असोसिएशनचे अध्यक्ष रायसोनी व इतर सर्व औद्योगिक असोसिएशनचे पदाधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil, MP Smita Wagh, MLA Suresh Bhole etc. while unveiling the cornerstone during the Bhoomi Puja of Udyog Bhawan, Truck Terminus site.
Jalgaon Crime : कडगावला धावत्या डंपरवर दगड भिरकावून रोकड लंपास; ‘फोन-पे’वरही घेतले पैसे

प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या रचनेविषयी माहिती दिली. खादी ग्रामोद्योगचे ज्येष्ठ पर्यवेक्षक जगदीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डीआयसीचे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे यांनी आभार मानले.

असे असेल उद्योग भवन

तीन हजार ८९२ चौरस मीटर जागेत तीन मजली इमारत उभी राहील. यात जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्राम उद्योग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि उद्योजकता विकास केंद्राच्या इमारती एका छताखाली येणार आहे. सभागृह, व्यापारी गाळे व कॅन्टीन असेल.

ट्रक टमिनन्स असे असेल

२२ हजार ७०० चौरस मीटर जागेत ट्रक टर्मिनलमध्ये १०० ट्रकसाठी भव्य पार्किंग, ऑफीस, गॅरेज, विश्रामगृह, हायमास्ट व पथदिवे, रस्ते डांबरीकरण, कॅन्टीन पूर्ण भूखंडासाठी संरक्षकभिंत बांधकाम असेल. यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नातून उद्योग भवनसाठी २१ कोटी तर ट्रक टर्मिनलसाठी १९ कोटी असा एकूण ४० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

Guardian Minister Gulabrao Patil, MP Smita Wagh, MLA Suresh Bhole etc. while unveiling the cornerstone during the Bhoomi Puja of Udyog Bhawan, Truck Terminus site.
Jalgaon Cyber Fraud : वाघनगरातील बहिणींना सहा लाखांचा चुना; आभासी नफा दाखवून सायबर गुन्हेगारांनी गंडविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.