Gulabraon Patil : पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी चार हजारांपेक्षा भाविकांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने व वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करीत राहणार आहोत. संतकार्यासाठी सदैव झटत राहणार आहे. कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Gulabrao Patil statement on Religious institutions are more important than political institutions )
तालुक्यातील पाळधी श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र, जि. प.चे माजी सदस्य प्रताप पाटील व मित्र परिवाराने आयोजित ७९ भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला, त्याप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाने सनातन संस्कृती टिकवली आहे. गावागावांत संप्रदाय वाढवाला आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणीव भासत असल्याने सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्यांचे वाटप केले जात आहे. (latest marathi news)
जिल्हास्तरीय वारकरी भवन उभारण्याचा मानस पूर्ण होत असल्याने त्याचा मनस्वी आनंद आहे. वारकरी संप्रदायवाढीसाठी व जनसामान्यांच्या कार्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. गजानन महाराज यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रताप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सी. एस. पाटील यांनी केले. सुशील महाराज विटनेरकर यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. चतुर्भुज महाराज धरणगावकर, पांडुरंग महाराज आवरकर, श्याम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, सुशील महाराज विटनेरकर, समाधान महाराज भोजेकर, कैलास महाराज चोपडाईकर, बाबा हंस महाराज, पवन सोनवणे, नीलेश पाटील, संजय पाटील, अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, विक्रम पाटील, डी. ओ. पाटील, अर्जुन पाटील, शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, रवींद्र चव्हाण, सचिन पवार, कैलास पाटील, भरत बोरसे, दुध संघाचे रमेश पाटील, जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, स्वप्नील परदेशी, भानुदास विसावे, परिसरातील सरपंच, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.