Guru Purnima 2024 : सेवानिवृत्त शिक्षकांकडून 92 वर्षीय गुरूचा सन्मान!

Jalgaon News : ७०वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने ९२वर्षीय गुरुंच्या निवासस्थानी जाऊन गुरुपौर्णिमेला सन्मान केला. हा दुर्मीळ सुयोग रविवारी (ता.२१) शहरातील सुदर्शन कॉलनीत जुळून आला.
Senior teacher H. S. While honoring Patil, retired teacher B. R. Patil.
Senior teacher H. S. While honoring Patil, retired teacher B. R. Patil.esakal
Updated on

चोपडा : आपल्या जीवनाला सुसंस्कारीत करून आकार देणाऱ्या आपल्या ९२वर्षीय गुरुची आठवण ठेवून ७०वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुरुपौर्णिमेला सन्मान केला. हा दुर्मीळ सुयोग रविवारी (ता.२१) शहरातील सुदर्शन कॉलनीत जुळून आला. (jalgaon Guru Purnima 2024 marathi news)

तालुक्यातील गरताड येथील रहिवासी व कुरवेल विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक बी. आर. पाटील असे गुरूंचा सन्मान करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर येथील प्रताप विद्या मंदिरातून २४ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले शिक्षक एच. एस. पाटील असे सन्मानीत झालेल्या त्यांच्या गुरुंचे नाव आहे.

शिक्षक हा आपल्या गुरूला कधीही विसरत नसतो. शिक्षकांनी गुरूशिष्य परंपरा जोपासली पाहिजे, असा संदेश यातून मिळतो. एच. एस. पाटील यांना सेवानिवृत्त होवून २४ वर्षे झालीत. तब्येत चांगली असली तरी वार्धक्याने ते घराबाहेर पडत नाहीत, यासाठी शिष्य व सेवानिवृत्त शिक्षक बी. आर. पाटील हे गुरूच्या भेटीसाठी रविवारी सकाळी नऊ वाजताच त्यांच्या घरी भेटीसाठी आले. (latest marathi news)

Senior teacher H. S. While honoring Patil, retired teacher B. R. Patil.
Guru Purnima 2024 : "आई तू माझ्यासाठी केलेला त्याग..." ; अंकिताने आईला दिल्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

त्यांनी आपल्या गुरूंची भेट घेत नमस्कार करीत त्यांचा सन्मान केला. यावेळी शिक्षक एच. एस. पाटील यांचे डोळे पाणावले. मी घडविलेले शिष्य मला अजूनही विसरत नाहीत, हीच माझी खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले. यालाच गुरूशिष्याचे नाते म्हणतात. यावेळी गुरू शिष्य यांच्यात भूत काळातील गप्पाही रंगल्या. ‘गुरू साक्षात् परं ब्रह्म’ असे म्हणतात.

म्हणून आपण केलेल्या कामाची पावती शिष्याकडून जरूर मिळते. या धकाधकीच्या युगातही गुरूशिष्य नात्याची परंपरा टिकून आहे. गुरूशिष्य परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. आजही माणसाला वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मार्गदर्शकाची गरज पडते, म्हणूनच गुरूला महत्व आहे.

Senior teacher H. S. While honoring Patil, retired teacher B. R. Patil.
Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेनिमित्त श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर राहणार खुले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.