Jalgaon News : हागणदारीमुक्तीची मोहीम फलकावरच! प्रत्यक्षात कृती कुठे?

Jalgaon : हागणदारीमुक्ती फक्त फलकावरच दिसून येते. प्रत्यक्षात ही योजना कृतीत उतरलीच नसल्याचे सर्वत्र दिसून येते.
board of Hagandari Mukt scheme
board of Hagandari Mukt schemeesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी प्रत्येक गावात हागणदारीमुक्त गाव, अशा आशयाचे लोखंडी फलक स्वच्छ भारत मिशन योजनेद्वारे जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामपंचायतीच्या परिसरात सर्वच खेड्यांमध्ये लावण्यात आलेत. वास्तविक पाहता त्यावेळेला ही तशी परिस्थिती कुठेच दिसली नाही. आजच्या घडीला ही हागणदारीमुक्ती फक्त फलकावरच दिसून येते. प्रत्यक्षात ही योजना कृतीत उतरलीच नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ( Hagandarimukt is visible only on board )

साधारणपणे चार-पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात सर्व मॅटरसारखे असून, फक्त गावाचे नाव कागदी स्टिकरने चिटकवलेले. लोखंडी फलक गाव स्वच्छ व हागणदारीमुक्त झाल्याचे ग्रामपंचायत परिसरात लावण्यात आले. अनेक वर्षांपूर्वी आलेली ही योजना खरे म्हणजे खूपच चांगली होती. त्यानंतरच्या दशकात खेडोपाडी किमान पाचशे ते हजार शौचालयांसाठी अनुदानही देण्यात आले.

प्रत्यक्ष तशी कार्यवाही झाली आणि कृतीही दिसून आली. मात्र, सार्वजनिकरीत्या विचार करता संपूर्ण गाव हागणदारी मुक्त झाल्याचे फार कमी ठिकाणी दिसून आले. त्या-त्या गावांनी त्या योजनेत बक्षीसही मिळविले. मात्र, त्यानंतरही त्या गावात काहीच दिवसात परिस्थिती ‘जैसे थे’ झाली, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात कृतीत न येता फक्त फलकापुतीच सीमित राहिल्याचे आजही दिसून येते. (latest marathi news)

board of Hagandari Mukt scheme
Jalgaon Agriculture News: मृग नक्षत्र सुरू, जामनेरात मशागतीला वेग! तालुक्यात 99 हजार हेक्टरवर पेरणी; कापसाला प्राधान्य

याबाबतीत एक गोष्ट मात्र लक्षात येते की, गेल्या दहा, पंधरा, वीस वर्षांत शहरी भागात दिसून येत असलेली प्रत्येक घरात शौचालय असल्याची योजना खेड्यांमध्ये ही आता दिसू लागली असून, पाच हजार लोकवस्तीच्या गावात किमान चारशे ते पाचशे घरांमध्ये शौचालय झाल्याचे दिसून येते. त्यात काही शौचालयांना अनुदान मिळाले असले तरी काही कुटुंबप्रमुखांनीच स्वतः बांधून घेतल्याचे दिसून आले आहे.

अनेक खेड्यांत शोषखड्ड्याचे शौचालय झाले आहे. ते उत्तमरीत्या चालत असल्याची ही बाब लक्षात आली आहे. एकंदरित पाहता वैयक्तिकरित्या झालेले शौचालयाची योजना कृतीमध्ये चांगल्या प्रकारे उतरली. तरीही गावाचा एकूण विचार करता सार्वजनिक वापरलेली योजना फक्त फलकावरच दिसत असल्याची अनेक खेड्यांतील स्थिती आजही स्पष्टपणे दिसून येते.

board of Hagandari Mukt scheme
Jalgaon News: धरणगाव तालुक्यात 45, 563 हेक्टरवर लागवड प्रस्तावित! शेतजमीन तयार; पेरणीसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.