Jalgaon Unseasonal Rain Damage : शहरासह परिसरात सोमवारी (ता. २६) रात्री आठच्या सुमारास वादळीवाऱ्यासह सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. पिंपरखेड (ता. चाळीसगाव) परिसरात गोटीच्या आकाराच्या गारा पडल्याने काढणीला आलेल्या कांद्यांसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले.
आज सकाळपासूनच वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला होता. मात्र, पाऊस होईल असे चिन्ह दिसत नव्हते. (Jalgaon Hailstorm damage crops in Chalisgaon taluka)
सायंकाळी शहरासह तालुक्यातील काही भागात जोराचा वारा सुटला. अशातच सायंकाळी अवकाळी पावसाला सुरवात झाली. पिंपरखेड परिसरात कांद्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असून काही शेतकऱ्यांचा कांदा काढणीवर आलेला होता.
अशातच आजच्या वादळी पावसात गारपीट झाल्याने कांद्यांचे मोठे नुकसान झाले. गोटीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला गेला. कांद्यांसोबतच काढणीला आलेला गहू व हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले.
शेतातील अनेक भागात गारांचा खच पडलेला होता. रात्री आठच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.