Jalgaon Unseasonal rain Damage : जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (ता.२६) रात्री वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. यात पारोळा, अमळनेर, रावेर या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
रब्बी हंगाम समाधानकारक होईल, या आशेने शेतकऱ्याने शेतात पैसा ओतला. मजुरांवर अवलंबून न राहता रात्रीचा दिवस करीत शेतातील पिकाला लहानाचे मोठे केले. (Hailstorm in Parola Raver Amalner taluka)
ऐन तोंडात आलेला घास तारीख सोमवारी (ता. २६) आलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने हिरावला गेला आहे. दरम्यान, पारोळा शहरासह तालुक्यातील करंजी बुद्रूक तसेच तालुक्यातील इतर मंडळात मोठ्या प्रमाणात तसेच आकाराने मोठी असलेली गारपीट झाल्याने रब्बी हंगाम धोक्यात आल्याचे दिसून येते.
तसेच ज्वारी, हरभरा व गहू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बरीच पिके जमिनीवर कोसळली असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. या वेळी करंजी बुद्रूक, शेवगे बुद्रूक तसेच महाळपूर, बहादरपूर, शिरसोदे परिसरासह शेवगे प्र.ब, बोळे, ढोली, वेल्हाणे या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाली असल्याची माहिती माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, करंजी बुद्रूक येथील सरपंच भय्यासाहेब रोकडे.
शेवगे बुद्रूक येथील माजी सरपंच सदाशिव पाटील, नूतन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष गंगाराम महाजन यांनी परिसरात गारांचा पाऊस झाला असल्याची माहिती दिली. दरम्यान, सकाळी महसूल विभागाने तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी अपेक्षा शेतकरी यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
वादळी पावसाने झोडपले
अमळनेर : तालुक्यात सोमवारी रात्री नऊनंतर अनेक ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली असून, शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. यात पातोंडा, दहिवद, हेडावे या भागात गारपीट झाली असल्याचे समजते. गहू, हरभरा, मका तसेच इतर शेतीपिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.
रावेर तालुक्यात बेमोसमी पाऊस, कर्जोदला बेदाणा आकाराच्या गारा
रावेर : तालुक्यात रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तर कर्जोद येथे बेदाणा आकाराएवढी गार पडली. यामुळे ऐन कापणीवर आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात आज सर्वत्र दुपारी वातावरणात उकाडा जाणवत होता.
दिवसभर ढगाळ वातावरण होते. सर्वत्र दहा ते पंधरा मिनिटे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अनेक भागातील हरभरा पिकाची कापणी झाली आहे. हा हरभरा शेतात पडून आहे. तर बहुतांश हरभरा पीक कापणीवर आहे. यामुळे हरभरा कापणी लांबणीवर पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.