Jalgaon Mango Business: ‘हापूस’, ’केसर’ने खाल्ला भाव; ‘बदाम’ही पसंतीस! अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबे विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’

Jalgaon News : आखाजीच्या मुहूर्ताच्या आंबे खरेदीसाठी शुक्रवारी सकाळपासून विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.
Traders selling Hapus mangoes and other varieties of mangoes.
Traders selling Hapus mangoes and other varieties of mangoes.esakal
Updated on

पारोळा : खानदेशातील महत्त्वाचा सण असलेला आखाजी म्हणजे अक्षय तृतीया हा सण शुक्रवारी (ता. दहा) सर्वत्र उत्साहात साजरा झाला. आखाजी सणाला आंब्याला खूपच महत्त्व असते. विशेष म्हणजे, अक्षय तृतीया या सणापासूनच आंबे खायला म्हणजे आंब्याचा रस व पुरण पोळी या जेवणाला सुरवात होते. त्यामुळे आखाजीच्या मुहूर्ताच्या आंबे खरेदीसाठी शुक्रवारी सकाळपासून विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. (Jalgaon profit to Mango Sellers on occasion of Akshaya Tritiya)

खानदेशात अक्षय तृतीया म्हणजे आखाजी महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून आंब्याचा रस व पूरण पोळी केली जाती. त्यामुळे आंबा हा महत्त्वपूर्ण मानला जातो. म्हणून महाग का असेना, प्रत्येक घरी आंब्याचा रस व पुरण पोळी असे जेवण बनविले जाते.

दरम्यान, येथील बाजारपेठेत विजयवाडा येथून सीआर आंब्याची जात मोठ्या प्रमाणात दाखल झाली असून, त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. सीआर आंबा हा शंभर रुपये प्रतिकिलो विकला गेला, तर हापूस आंबा सातशे रुपये डझनने विकला गेला.

दरम्यान, अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर आंबेविक्री व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून आले. यावेळी आठवडी बाजारपेठेत आंबाविक्री जास्त प्रमाणात दिसून आली, तर काही भाजीपाला विक्रेत्यांनी आंबाविक्रीला पसंती दर्शविली.

डांगरला अनन्यसाधारण महत्त्व

अक्षयतृतीयेला आंब्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारपेठेत दहशहरी, केसर, बदाम, सीआर असे आंब्याचे वाण दाखल झाले आहे. मात्र, रत्नागिरीचा हापूस आंब्याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी दिसून आली. आमरसबरोबरच डांगरला या सणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वजांचे स्मरण म्हणजे घागर भरणे, यासाठी डांगर लागते. आज ते बाजारात पन्नास रुपये किलो दराने विकले जात होते. (latest marathi news)

Traders selling Hapus mangoes and other varieties of mangoes.
Mango Season : नेमका हापूस कुठला? 'हे' कसे ओळखायचे?

बाजारपेठेतील आंब्याचे दर (प्रतिकिलो)

दहशहरी - १०० रुपये

केसर - ११० रुपये

बदाम -१०० रुपये

सीआर - ९० रुपये

हापूस - ७०० रुपये डझन

"यावर्षी आंब्याला ग्राहकांकडून चांगली मागणी आली. गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत ग्राहक चांगले झाले. होलसेल व्यापारी बरोबर घाऊक किरकोळ विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले."

- संजय मराठे, आंबे विक्रेता, पारोळा.

Traders selling Hapus mangoes and other varieties of mangoes.
Alphonso Mango : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाशीत तब्बल 90 हजार 'हापूस'च्या पेट्या दाखल; पाच डझनला 'इतका' आहे दर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.