Jalgaon Crime : रावेर येथील विवाहितेचा विदेशात छळ; पती, सासरा, सासू, नणंद विरोधात गुन्हा दखल

Jalgaon Crime : लग्नाच्या काही महिन्यानंतर पतीसह सासरवासीयांनी सृष्टीला माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास द्यायला सुरवात केली.
crime News
crime Newsesakal
Updated on

रावेर : येथील विवाहित तरुणीला लग्नानंतर काही दिवसातच विदेशात (पोलंड) येथे गेल्यानंतर पतीने माहेरून ६० लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी तर नांदरखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे सासरी सासू, सासरा, नणंद यांनी कनिष्ठ वागणूक देऊन मानसिक छळ केल्याप्रकरणी हरी रामजी पाटील, सचिन हरी पाटील, पूजा सचिन पाटील, अरुणा भरत पाटील, भरत बधू पाटील या ६ जणांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Harassment of married woman from Raver abroad Case registered against )

येथील विवाहिता सृष्टीचा विवाह मयूर पाटील याचेशी ७ डिसेंबर २०२१ ला झाला. मयूरने विदेशात स्वतःचे घर, गावी १६ एकर जमीन व उच्च पदस्थ नोकरी करीत असल्याची दिशाभूल करून येथील सृष्टी व त्यांच्या माहेरील कुटुंबाला विश्वासात घेतले. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी लग्नात मुलीच्या सुखापोटी लाखो रुपये खर्च केले. तसेच मुलीचे कुटुंबीय श्रीमंत असल्याचे पाहून लग्नाच्या काही महिन्यानंतर पतीसह सासरवासीयांनी सृष्टीला माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास द्यायला सुरवात केली.

crime News
Jalgaon Crime News : तोतया अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या! वनरक्षक म्हणून नोकरी लावण्याचे दाखवले आमिष

तसेच सृष्टीला पोलंड येथे घेऊन गेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे काहीही सत्य आढळून आले नाही. यामुळे तिने वडिलांना सर्व परिस्थिती सांगितली. मयूर हा सृष्टीला तासनतास घराबाहेर थंड बर्फात ताटकळत उभे करून त्रास देत असे. मात्र विदेशी भाषा येत नाही, त्यात तिथे कोणीही नातेवाईक नाही. त्यामुळे तिला मरणासन्न परिस्थितीला सामोरे जावे लागले व मृत्यूच्या दाढेतूनच परतली असल्याचे कथन तिने पोलिसांसमोर केले.

सर्व प्रकारातून कशीबशी सुटका करून तिने मुंबई गाठले. ही घटना तिने सासरे, सासू व इतर नातेवाईकांना सांगितले असता त्यांनी समजून न घेता त्याउलट तिला जास्त त्रास दिला. यापुढे सृष्टीला नांदायचे असेल तर ६० लाख रुपये घेऊन ये असे सांगत कायम तिचा छळ केला आहे. या प्रकरणी सृष्टीच्या तक्रारीवरून ६ जणांविरुद्ध विवाहितेचा छळ करणे, फसवणूक करणे, मारहाण करणे असा रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime News
Jalgaon Crime : धावत्या रिक्षात महिलेच्या पर्सवर डल्ला; 40 हजारांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.