Jalgaon Police Transfer : अमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांची तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यात पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद तुकाराम पाटील, पोलिस नाईक दीपक शांताराम माळी, रवींद्र अभिमन पाटील यांचा समावेश आहे. माजी नगरसेवक पुत्राच्या मृत्यूच्या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीतून या तीन कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी झाल्याची चर्चा आहे. (Jalgaon Hasty transfer of 3 policemen to Amalner)
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी (ता. २) रात्री बदलीचे आदेश काढले. शरद पाटील (भडगाव), दीपक माळी (बोदवड), रवींद्र पाटील (अडावद) यांची बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांविषयी वाढलेल्या तक्रारी, आपापसातील चढाओढीची माहिती पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचली होती.
त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली. अमळनेर येथील माजी नगरसेवक पुत्राच्या मृत्यूनंतर दाखल आकस्मिक मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) वरील तीन जणांना बोलावले होते. त्यानुसार २६ फेब्रुवारीला त्यांची चौकशी झाली. (latest marathi news)
असे होते प्रकरण
अमळनेरला लहान मुलांच्या भांडणाचे पर्यवसान दोन गटांमधील तुफान दगडफेकीत झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या धरपकडीत अशफाक सलीम शेख (वय ३३, रा. दर्गा मोहल्ला, अमळनेर) याला ताब्यात घेतले होते.
तो अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम शेख यांचा मुलगा असून, त्याला पोलिस कोठडी दिल्यावर कोठडीत त्याची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.