जळगाव : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ११९ टक्क्यांवर पाऊस झाला आहे. अनेक तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्याची नोंद झाली असून, जिल्ह्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. त्याचा खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट येण्याचीही शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रत्येक तालुक्यातून होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील एक हजार ५०६ गावांमधील नजर पैसेवारी ५० च्या वरच जाहीर झाली आहे. यावरून खरीप हंगामातील पीकस्थिती समाधानकारक असल्याचे दर्शविते. (Heavy Rain Crop Damage of kharif season in district )