जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी (ता. २५) कायम होता. रात्री पावसाने चोपडा, पारोळा, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव या पाच तालुक्यांतील नऊ मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे.
सततच्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या तुलनेत १०० टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, २७ ऑगस्टपासून पावसाची उघडीप मिळेल, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे. (Heavy rain in 9 mandals of district)